Flipkart Sale : अवघ्या ८ मिनिटांत आयफोनची डिलिव्हरी, ग्राहकाचा आनंद गगनात मावेना!-iphone 15 delivered in 8 minutes man shares awesome flipkart experience ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale : अवघ्या ८ मिनिटांत आयफोनची डिलिव्हरी, ग्राहकाचा आनंद गगनात मावेना!

Flipkart Sale : अवघ्या ८ मिनिटांत आयफोनची डिलिव्हरी, ग्राहकाचा आनंद गगनात मावेना!

Sep 27, 2024 10:12 PM IST

Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्टने अवघ्या ८ मिनिटांत आपल्या ग्राहकाने ऑर्डर केलेल्या आयफोनची डिलिव्हरी केली आहे.

 अवघ्या ८ मिनिटांत आयफोनची डिलिव्हरी
अवघ्या ८ मिनिटांत आयफोनची डिलिव्हरी (Bloomberg)

नiPhone 15: फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल २०२४ आणि अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२४ सेलला आजपासून सुरुवात झाली आहे.  या सेलअंतर्गत ग्राहकांना आयफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अॅपलने काही दिवसांपूर्वीच आयफोन १६ सीरिज लॉन्च केली आहे.  दरवर्षी आपण पाहतो की, आयफोनची कोणतीही नवीन सीरिज बाजारात दाखल होताच काही मिनिटांतच त्याची विक्री होते. सध्या फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहक आयफोन १५ आणि गुगल पिक्सेल ८ सारखे इतर फोन अगदी सहजपणे आणि विनाअडथळा खरेदी करू शकले आहेत. यंदा विक्री अधिक सोयीस्कर आणि वेगवान झाली आहे. फ्लिपकार्ट एका ग्राहकाने ऑर्डर दिली आणि अवघ्या ८ मिनिटांत आयफोन १५ त्याच्या घरी पोहोचला.

आयफोन १५ ची ऑर्डर करणारा व्यक्ती बेंगळुरूचा असून त्याने फ्लिपकार्टच्या मिनिट्स सर्व्हिसद्वारे ऑर्डर दिली. शेवटी अवघ्या ८ मिनिटांत त्याला त्याची ऑर्डर मिळाली, जी ब्लिंकिट सारख्या डिलिव्हरी सेवेशी तुलना करता येईल. आपला आनंद व्यक्त करताना त्या व्यक्तीने सांगितले की, ‘मला फ्लिपकार्टवरून फक्त ८ मिनिटांत आयफोन १५ मिळाला, हा डिलिव्हरीचा छान अनुभव आहे.  खूप खूप धन्यवाद, फ्लिपकार्ट!’

फ्लिपकार्ट ऑफर्स:

आयफोन १५: गेल्या वर्षी लान्च झालेला आयफोन १५ स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज दरम्यान या फोनला ५४ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले. यात १ हजार ५०० रुपयांचा बँक डिस्काउंट आणि ३००० रुपयांचा एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. तर, ऑफर्सनंतर याची किंमत ५० हजार ४९९ रुपये असेल. जर तुम्हाला चांगले एक्स्चेंज व्हॅल्यू मिळाले तर ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे डिव्हाइस तुमचे होईल.

आयफोन १५ प्लस: ६.७ इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला आयफोन १५  प्लस ६४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लिस्ट झाला असून बिग बिलियन डेज सेलदरम्यान एचडीएफसी बँक कार्डसह १५०० रुपयांची सूट देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेता येईल. चांगल्या एक्स्चेंज व्हॅल्यूसह हे डिव्हाइस ६० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ऑर्डर केले जाऊ शकते.

आयफोन १५ प्रो: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरील बिग बिलियन डेज सेलदरम्यान आयफोन १५ प्रो ८९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. या फोनवर ५००० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि ५००० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्स्चेंज ऑफर दिली जात आहे. डिव्हाइसमध्ये चांगली झूम क्षमता आणि ए १७ प्रो प्रोसेसर आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग अधिक चांगले होते.

आयफोन 15 प्रो मॅक्स:  फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन १५ प्रो मॅक्स २ लाख ०९ हजार ९०० रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या व्हेरियंटवर ५००० रुपयांचा बँक डिस्काउंट आणि ५०००० रुपयांचा एक्स्ट्रा एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. 

Whats_app_banner