अॅपल कंपनीने नुकतीच त्यांची आयफोन १६ सीरिज लॉन्च केली. मात्र, त्यानंतर आयफोन १५ कपात करण्यात आली. अशातच ग्राहकांच्या आनंदात आणखी भर घालणारी माहिती समोर येत आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल उद्यापासून (२७ सप्टेंबर २०२४) पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन १५ च्या मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना आयफोन ११, आयफोन १३ आणि इतर फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन १५ किती रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध असेल, याबाबत कोणीतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या सेलमध्ये आयफोन १५ ची किंमत ५० हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. याशिवाय, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स अनुक्रमे ८९ हजार ९९९ रुपये आणि १ लाख ०९ हजार ९०० रुपयांमध्ये बँक ऑफर्स आणि डिस्काउंटसह ऑफर केले जातील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
आयफोन १६ बाजारात दाखल झाल्यानंतर आयफोन १५ च्या किंमतीत कपात करण्यात आली. दरम्यान, १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६९ हजार ६०० रुपयांपासून सुरू होते. तर, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट अनुक्रमे ७९ हजार ६०० आणि ९९ हजार ६०० रुपयांना उपलब्ध आहे.
अॅपल आयफोन १५ मध्ये ६ जीबी रॅमसह ए १६ बायोनिक चिप आहे. फोनमध्ये ६० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन १५ मध्ये अॅपल आयफोन १४ प्रो प्रमाणे ४८ एमपी प्रायमरी सेन्सर आहे. ४८ एमपी कॅमेरा १२ एमपी सेकंडरी सेन्सरसह समर्थित आहे. आयफोन १५ ची डिझाइन सुंदर आहे. आयफोन १५ मध्ये डायनॅमिक आयलंडसह स्लिम बेजल्स आणि नॉचलेस डिझाइन देण्यात आले आहे. फोनच्या मागील बाजूस फ्रॉस्टेड ग्लास आणि थोडा मोठा कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. आणखी एक मोठा लक्षणीय बदल म्हणजे खालच्या बाजूला यूएसबी-सी पोर्ट.