flipkart iphone 14 news : ही संधी सोडू नका! १२८ जीबीच्या 5G आयफोनवर तब्बल २३ हजारांची सूट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  flipkart iphone 14 news : ही संधी सोडू नका! १२८ जीबीच्या 5G आयफोनवर तब्बल २३ हजारांची सूट

flipkart iphone 14 news : ही संधी सोडू नका! १२८ जीबीच्या 5G आयफोनवर तब्बल २३ हजारांची सूट

Updated Feb 24, 2024 03:14 PM IST

flipkart iphone 14 news : अ‍ॅपलनं २०२२ मध्ये लाँच केलेला १२८ जीबी स्टोरेज क्षमतेचा आयफोन १४ वर तब्बल २३ हजारांची सूट मिळत आहे.

iPhone 14
iPhone 14

flipkart iphone 14 news : ‘आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तो स्वस्तातही हवा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. फ्लिपकार्टवर तुमचं हे स्वप्न साकार होऊ शकतं. फ्लिपकार्टवर 'आयफोन १४’ चे सर्व प्रकारच्या रंगांतील फोन अत्यंत कमी किंमतीत मिळत आहेत.

आयफोन १४ हा आयफोन १५ पेक्षा थोडा जुना असला तरी iOS डिव्हाइसवर स्विच करू पाहणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. आयफोन १४ आणि १५ मध्ये डिझाइनच्या बाबतीत अजिबात फरक नाही.

मूळ किंमतीपेक्षा २३ हजारांनी स्वस्त

अ‍ॅपलनं २०२२ मध्ये आयफोन १४ लॉन्च केला होता. त्यावेळी १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये होती. हाच फोन आता फ्लिपकार्टवर केवळ ५६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच हा फोन त्याच्या मूळ किंमतीपेक्षा २२,९०१ रुपयांनी स्वस्तात मिळत आहे.

या फोनच्या खरेदीवर अनेक बँकांनी ऑफर देऊ केल्या आहेत. त्यामुळं फोन आणखी कमी किंमतीत मिळू शकतो. जुना फोन असल्यास त्यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमच्याकडील जुन्या आयफोन १२ च्या बदल्यात आणखी २० हजार रुपयांपर्यंत आणि जुन्या आयफोन १३ च्या बदल्यात २९ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

काय आहेत आयफोन १४ ची वैशिष्ट्ये?

आयफोन १५ आला असताना आयफोन १४ का घ्यावा असा विचार काही लोक करू शकतात. अर्थात, आयफोन १५ अधिक स्मार्ट आणि अत्याधुनिक आहे, मात्र आयफोन १४ सुद्धा कमी नाही. iPhone 14 हे अजूनही एक प्रीमियम डिव्हाइस आहे आणि तो बाजारातील अनेक सर्वोत्तम स्मार्टफोनला टक्कर देतो. सवलतींमुळे तो सहज परवडूही शकतो.

आयफोन १४ आणि १५ चा लूक सारखाच आहे. मात्र, कंपनीनं लाँच केलेल्या नव्या आयफोन मॉडेल्समध्ये अधिक प्रभावी कॅमेरा आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. iPhone 14 मॉडेल 5G ला सपोर्ट करते आणि त्यात ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोन A15 बायोनिक चिपनं सुसज्ज आहे. फोनच्या तळाशी चार्जिंगसाठी फक्त लाइटनिंग पोर्ट आहे. यात सेल्फी कॅमेरा आणि फेस आयडी ठेवण्यासाठी एक नॉच आहे.

iPhone 14 मध्ये मागील बाजूस ड्युअल 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. याशिवाय, वायरलेस चार्जिंग, iOS 17 (अपडेटसाठी पात्र), AirDrop ची सुविधा आहे.

Whats_app_banner