PPF मध्ये दर महिन्याला १२,५०० गुंतवा, १५ वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त मिळवा! जाणून घ्या हे फायद्याचं गणित
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PPF मध्ये दर महिन्याला १२,५०० गुंतवा, १५ वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त मिळवा! जाणून घ्या हे फायद्याचं गणित

PPF मध्ये दर महिन्याला १२,५०० गुंतवा, १५ वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त मिळवा! जाणून घ्या हे फायद्याचं गणित

HT Marathi Desk HT Marathi
Oct 31, 2024 01:32 PM IST

PPF : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना अनेकार्थांनी फायद्याची आहे. यात नियमित गुंतवणूक केल्यास निवृत्तीची उत्तम आर्थिक सोय करून ठेवता येते.

PPF मध्ये दर महिन्याला १२,५०० गुंतवा, १५ वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त मिळवा! जाणून घ्या हे फायद्याचं गणित
PPF मध्ये दर महिन्याला १२,५०० गुंतवा, १५ वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त मिळवा! जाणून घ्या हे फायद्याचं गणित

PPF Calculator : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ खाते हे केंद्र सरकारची गुंतवणूक योजना आहे. जोखीममुक्त आणि करबचतीचं साधन म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. मात्र केवळ हेच या योजनेचे फायदे नाहीत. ही अल्पबचत योजना आकर्षक दीर्घकालीन परतावाही देते. 

सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळते. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षांचा असतो, पण तो ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये अनिश्चित काळासाठी वाढवता येतो. त्यामुळं रिटायरमेंट कॉर्पस तयार करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.

या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवता येतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात आपण दरमहा १२,५०० रुपये गुंतवल्यास १५ वर्षांच्या कालावधीत जवळपास ४१ लाख रुपये जमा होऊ शकतात.

जाणून घेऊया किती परतावा मिळू शकतो?

मासिक गुंतवणूक : १२,५०० रुपये

वार्षिक गुंतवणूक : १,५०,००० रुपये

कालावधी : १५ वर्षे

व्याज दर: ७.१%

गुंतवणूक रक्कम : २,२५,००० रुपये

एकूण व्याज : १८,१८,२०९ रुपये

मॅच्युरिटी व्हॅल्यू : ४०,६८,२०९ रुपये.

पीपीएफ खात्याची मुदत पाच-पाच वर्षांसाठी वाढवता येते. खातेधारकानं एक्सटेंशन बेनिफिटचा वापर केला आणि पुढील १५ वर्षांसाठी कंपाउंडिंग बेनिफिटचा लाभ घेतला तर तो ३० वर्षांत १.५ कोटी रुपये कमवू शकतो.

पीपीएफ पर्याय चांगला का?

सुरक्षित गुंतवणूक : पीपीएफ ही सरकार पुरस्कृत योजना आहे. त्यामुळं तो गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे.

टॅक्स बेनिफिट्स : पीपीएफ योजना करदात्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. कारण ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे. पीपीएफ ईईई टॅक्ससाठी पात्र आहे. आयटी कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत पीपीएफ ठेवी प्रति आर्थिक वर्ष १.५ लाख रुपयांपर्यंत करवजावट पात्र आहेत. शिवाय गुंतवणुकीतून मिळणारं व्याज आणि पीपीएफ मॅच्युरिटीची रक्कमही करमुक्त असते.

Whats_app_banner