Inventurus Knowledge IPO : पहिल्याच दिवशी शेअरचा भाव १९०० पार; रेखा झुनझुनवाला यांचीही आहे कंपनीत गुंतवणूक
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Inventurus Knowledge IPO : पहिल्याच दिवशी शेअरचा भाव १९०० पार; रेखा झुनझुनवाला यांचीही आहे कंपनीत गुंतवणूक

Inventurus Knowledge IPO : पहिल्याच दिवशी शेअरचा भाव १९०० पार; रेखा झुनझुनवाला यांचीही आहे कंपनीत गुंतवणूक

Dec 19, 2024 11:22 AM IST

Inventurus Knowledge Solutions IPO Listing : रेखा झुनझुनवाला यांच्यासह अनेक दिग्गज लोक प्रवर्तक असलेल्या इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्सच्या आयपीओनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली आहे. हा शेअर ४३ टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला आहे.

Inventurus Knowledge IPO : पहिल्याच दिवशी शेअरचा भाव १९०० पार; रेखा झुनझुनवाला यांचीही आहे कंपनीत गुंतवणूक
Inventurus Knowledge IPO : पहिल्याच दिवशी शेअरचा भाव १९०० पार; रेखा झुनझुनवाला यांचीही आहे कंपनीत गुंतवणूक

Inventurus Knowledge Solutions IPO News Marathi : इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्सने शेअर बाजारात दमदार पदार्पण केलं आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) हा शेअर ४३ टक्के प्रीमियमसह १९०० रुपयांवर लिस्ट झाला आहे. तर, मुंबई शेअर बाजारात (BSE) १८५६ रुपयांवर लिस्ट झाला आहे. त्यामुळं गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

आयपीओमध्ये इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्यूशन्सचा आयपीओ १२ डिसेंबर २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि १६ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीचा एकूण इश्यू साइज २४९७.९२ कोटी रुपयांपर्यंत होता. शेअरची किंमत १३२९ रुपये होती. दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचीही या कंपनीत गुंतवणूक आहे.

लिस्टिंगनंतरही शेअरमध्ये वाढ

एनएसईवर लिस्टिंग झाल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ झाली. हा शेअर १९३८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. तर बीएसईमध्ये कंपनीचा शेअर १९४२.१० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. सचिन गुप्ता, रेखा झुनझुनवाला, आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट, आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट आणि निष्ठा झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओच्या आधी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ६९.७३ टक्के होता, तो आता ६०.६१ टक्क्यांवर आला आहे.

कसा होता आयपीओला प्रतिसाद?

इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्सचा आयपीओ एकूण ५२.६८ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा १४.५५ पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा (NII) २३.२५ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओला क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत ८०.६४ पट सब्सक्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ११ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी १४,६१९ रुपये गुंतवावे लागले.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner