Intraday stocks : इंट्राडे ट्रेडिंगसाठी आज खरेदी करा ओला इलेक्ट्रिकसह हे ५ स्वस्त शेअर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Intraday stocks : इंट्राडे ट्रेडिंगसाठी आज खरेदी करा ओला इलेक्ट्रिकसह हे ५ स्वस्त शेअर्स

Intraday stocks : इंट्राडे ट्रेडिंगसाठी आज खरेदी करा ओला इलेक्ट्रिकसह हे ५ स्वस्त शेअर्स

Jan 07, 2025 10:40 AM IST

Intraday Stocks For Today : शेअर बाजारातील सध्याच्या चढउतारांच्या पार्श्वभूमीवर इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी ५ स्वस्त शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात ओला इलेक्ट्रिकचाही समावेश आहे.

आज ओला इलेक्ट्रिकसह १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे ५ शेअर्स खरेदी करणे शहाणपणाचे आहे.
आज ओला इलेक्ट्रिकसह १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे ५ शेअर्स खरेदी करणे शहाणपणाचे आहे.

Stocks To Buy Under 100 : इंट्राडे ट्रेडिंगसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे पाच शेअर्स आज तज्ज्ञांनी सुचवले आहेत. यात आयओबी, ओला इलेक्ट्रिक, जैन इरिगेशन सिस्टीम्स, वक्रंगी आणि उदयकुमार इन्फ्रा यांचा समावेश आहे. ए

एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी या पाच शेअर्सची खरेदी-विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. पाहूया सविस्तर… 

सुगंधा सचदेवा यांची शिफारस

आयओबी

आयओबी ५०.४० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य किंमत ५२.७० रुपये आणि स्टॉपलॉस ४९.२० रुपये ठेवा.

ओला इलेक्ट्रिक

ओला इलेक्ट्रिक ८१ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ८४.२० रुपये आणि स्टॉपलॉस ७६ ते ७४.५० रुपयांवर ठेवा. 

महेश एम ओझा यांचे इंट्राडे शेअर

वक्रांगी

वक्रंगी ३२ ते ३३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ३६ रुपये, ३८ रुपये, ४२ रुपये आणि ४८ रुपये आणि स्टॉप लॉस २९ रुपये ठेवा.

उदयशिवकुमार इन्फ्रा

उदयशिवकुमार इन्फ्राचा शेअर ५४ ते ५५.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ५८.५० रुपये, ६२, ६५ रुपये आणि ७० रुपये आणि स्टॉपलॉस ५२ रुपयांवर ठेवा.

अंशुल जैन यांचा डे ट्रेडिंग स्टॉक

जैन इरिगेशन सिस्टीम्स

जैन इरिगेशन सिस्टीम्स ७१.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ७५.५० रुपये ठेवा आणि क्लोजिंग बेसिसवर ६९.५० रुपये स्टॉपलॉस ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner