Share Market News : केंद्रीय अर्थसंकल्प व अमेरिकेतील टॅरिफच्या घोषणेनंतरच्या चढउतारानंतर भारतीय शेअर बाजार पुन्हा स्थिरावताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी इंट्राडे व्यवहारासाठी ६ स्टॉक्सची शिफारस केली आहे.
चॉइस ब्रोकिंगचे सुमित बागरिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हॅन्ससेक्स सिक्युरिटीजएव्हीपीचे रिसर्च महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी ही शिफारस केली आहे. यात इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, आयएफसीआय लिमिटेड, आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड, जीएसएस इन्फोटेक लिमिटेड, पेनिन्सुला लँड लिमिटेड आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांचा समावेश आहे.
सुमित बागरिया यांचे शेअर्स
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर ७१.३२ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ७६.३ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ६८.८२ रुपये ठेवा.
सुगंधा सचदेवा यांनी सुचवलेले शेअर
आयएफसीआय हा शेअर ५२.२० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ५४.३० रुपये आणि स्टॉप लॉस ५०.९० रुपये ठेवा.
आलोक इंडस्ट्रीजचा शेअर १८.४० रुपयांना खरेदी करा. टार्गेट १९.३० रुपये आणि स्टॉपलॉस १७.८० रुपये ठेवा.
महेश एम ओझा यांची शिफारस
हा शेअर ५३ रुपयांपासून ५४.२५ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट प्राइस ५६ ते ५७.५० आणि ५९+ रुपये आहे. स्टॉपलॉस ५१ रुपयांच्या खाली ठेवा.
पेनिनसुला लँड लिमिटेडचा शेअर ३५ ते ३६.५० रुपयांपर्यंत खरेदी करा. लक्ष्य ३७.५० ते ३९ रुपये आणि ४१+ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ३३ रुपयांच्या खाली ठेवायला विसरू नका.
अंशुल जैन यांचा आजचा इंट्राडे स्टॉक
हा शेअर ४८.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ५२.५ रुपये आणि स्टॉपलॉस ४७ रुपये (क्लोजिंग बेसिस) ठेवा.
संबंधित बातम्या