Intraday Stocks for Today under ₹100 : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेली घसरण, त्यानंतर बुधवारी आलेली तेजी अशा चढउताराच्या वातावरणात इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ञांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले ७ शेअर्स सुचवले आहेत. कोणते आहेत हे शेअर जाणून घेऊया…
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, एव्हीपी - हेन्सेक्स सिक्युरिटीजचे महेश एम ओझा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी साऊथ इंडियन बँक, एक्सारो टाइल्स, एमएमटीसी, आयएफसीआय, मेडिको रेमेडीज, एसबीएफसी फायनान्स आणि इमॅजिकावर्ल्ड एंटरटेनमेंट या सात इंट्राडे शेअर्सची शिफारस केली आहे.
> सुमीत बागरिया यांची शिफारस
साऊथ इंडियन बँक : २६.७९ रुपयांना खरेदी करा, टार्गेट २९ रुपये, स्टॉप लॉस २५.५० रुपये ठेवा.
एक्सारो टाइल्स : हा शेअर ९.७८ रुपयांना खरेदी करा, टार्गेट १०.६० रुपये, स्टॉपलॉस ९.४० रुपये ठेवा.
> सुगंधा सचदेवा यांचे शेअर्स
एमएमटीसी : हा शेअर ७१.२० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ६७.५० रुपये आणि स्टॉप लॉस ७३.५० रुपये ठेवा.
आयएफसीआय : हा शेअर ५६.६० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ५३ रुपये, स्टॉप लॉस ५९.४० रुपये लावा.
> महेश एम ओझा यांचे इंट्राडे शेअर
इमॅजिकावर्ल्ड एंटरटेनमेंट : हा शेअर ६७ ते ६७.२५ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ६९.८० रुपये, ७१.५० रुपये, ७४ रुपये आणि ८० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ६४ रुपयांपेक्षा कमी ठेवा.
एसबीएफसी फायनान्स : ९० ते ९०.५० रुपयांना खरेदी करा, ९३.५० रुपये, ९७ रुपये आणि १०० रुपयांत टार्गेट करा, ८७ रुपयांपेक्षा कमी स्टॉपलॉस.
> अंशुल जैन यांची शिफारस
मेडिको रेमेडीज : हा शेअर ७१.४० रुपयांना खरेदी करा, टार्गेट ७५ रुपये आणि स्टॉपलॉस ६९ रुपये ठेवा.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले, 'निफ्टीचा मूळ कल कमकुवत आहे आणि बाजार २३०००-२३४०० च्या व्यापक श्रेणीत गेल्याचं दिसतं. २३४०० च्या अडथळ्याच्या पलीकडं निर्णायक पाऊल टाकल्यास बाजारात खरेदीचा सहभाग पुन्हा वाढू शकतो. मात्र, २२,९७५ च्या खाली घसरल्यास आणखी कमकुवत होऊन तो २२,८०० पर्यंत खाली येऊ शकतो.
निफ्टी बँक निर्देशांकाविषयी असित सी. मेहता यांचे एव्हीपी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह रिसर्च ऋषिकेश येडवे म्हणाले, 'बँक निफ्टी बुधवारी सकारात्मकपणे उघडला, नंतर बरेच चढउतार होऊन शेवटी ४८,७२४ पॉझिटिव्ह बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या बँक निफ्टी अनिश्चिततेचे संकेत देत आहे. मात्र, बँक निफ्टीला ४८,००० च्या आसपास आधार मिळेल. ही पातळी राखली तर तो ४९,५०० ते ५०,००० पर्यंत जाऊ शकतो. याउलट ४८,००० च्या खाली राहिल्यास आणखी कमकुवत होऊ शकतो.
संबंधित बातम्या