
Share Market News : रिझर्व्ह बँकेचं आज जाहीर होणारं पतधोरण आणि गेल्या काही दिवसांपासून बाजारात असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बाजार तज्ञांनी इंट्राडे खरेदीसाठी ८ स्टॉक्स सुचवले आहेत. यातील ३ स्टॉक्स १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. यात लॉयड्स इंजिनीअरिंग वर्क्स, धानी सर्व्हिसेस आणि एनएमडीसी यांचा समावेश आहे. तर इंटरडे ट्रेडिंगच्या ब्रेकआऊट स्टॉकबाबत चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागरिया यांनी महाराष्ट्र सीमलेस, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, एजिस लॉजिस्टिक्स, नॅटको फार्मा आणि रेडिंग्टन हे ५ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
सुगंधा सचदेवा यांचे शेअर्स
लॉयड्स इंजिनीअरिंग वर्क्स हा शेअर ७४ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ७६.४० रुपये आहे. स्टॉपलॉस ७२.४० रुपयांवर ठेवा.
धानी सर्व्हिसेस ७९.६० रुपयांना विकण्याचा सल्ला देण्यात आहे. टार्गेट ७७.४० रुपये ठेवा आणि ८१ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा.
अंशुल जैन यांनी सुचवलेले शेअर्स
एनएमडीसी ६५ रुपयांना खरेदी करा, टार्गेट ७० रुपये ठेवा आणि क्लोजिंग बेसिसवर स्टॉपलॉस ६३ रुपये ठेवा.
सुमीत बागरिया यांचे ५ ब्रेकआउट शेअर्स
हा शेअर ६५४.३० रुपयांना खरेदी करा, टार्गेट ७०० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ६३१ रुपये ठेवा.
एम्क्युअर फार्मास्युटिकल्स हा शेअर १,२८५.२५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट १,३७५ रुपये आणि स्टॉप लॉस १,२४० रुपये ठेवा.
एजिस लॉजिस्टिक्सचा शेअर ८१३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ८७० रुपये आणि स्टॉपलॉस ७८४ रुपयांवर ठेवा.
नॅटको फार्मा १,३२८ रुपयांना खरेदी करा. टार्गेट १४२१ रुपये आणि स्टॉपलॉस १२८१ रुपयांवर ठेवा.
रेडिंग्टन हा शेअर २४८ रुपयांच्या टार्गेटसह २२८ रुपयांना विकत घ्या.
संबंधित बातम्या
