मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO gray market : 'हा' आयपीओ ग्रे मार्केटमध्ये येण्याआधीच सुपरहीट, गुंतवणूकदारांसाठी ‘गुडन्यूज’

IPO gray market : 'हा' आयपीओ ग्रे मार्केटमध्ये येण्याआधीच सुपरहीट, गुंतवणूकदारांसाठी ‘गुडन्यूज’

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 08, 2022 06:45 PM IST

आयनॉक्स ग्रीन एनर्जीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 11 रुपयांच्या प्रीमियमवर (GMP) आहेत. या कंपनीचा आयपीओ ११ नोव्हेंबरला खुला होईल आणि १५ नोव्हेंबरला बंद होईल. त्याच वेळी अँकर गुंतवणूकदारांची बोली १० नोव्हेंबर २०२२ रोजी उघडेल.

IPO HT
IPO HT

आयनॉक्स विंडची उपकंपनी असलेल्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचा आयपीओ ११ नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. आयपीओ दाखल होण्यापूर्वी ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (GMP) वाढ झाली आहे. जीएमपी हे आयपीओच्‍या यश किंवा अपयशाचे माप देखील आहे. तथापि, आयनॉक्स ग्रीन एनर्जीचा जीएमपी काय आहे ते जाणून घेऊया.

११ रुपयांचा जीएमपी

आयनॉक्स ग्रीन एनर्जीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ११ रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. एका दिवसापूर्वी जीएमपी ७ रुपयांच्या वर होता. कंपनीने ६१ रुपये ते ६५ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. सध्याच्या जीएमपीनुसार, शेअरची लिस्टिंग ७६ रुपयांपर्यंत असू शकते.

या कंपनीचा आयपीओ ११ नोव्हेंबरला उघडेल आणि १५ नोव्हेंबरला बंद होईल. त्याच वेळी, अँकर गुंतवणूकदारांची बोली १० नोव्हेंबर २०२२ रोजी उघडेल. शेअर्सचे १८ नोव्हेंबर रोजी वाटप केले जाऊ शकते. कंपनीचे शेअर्स बुधवारी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्टॉक एक्सचेंज बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीचे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अस्तित्व आहे. एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स, इक्विरस कॅपिटल, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज आणि सिस्टेमॅटिक्स हे कॉर्पोरेट सेवा ऑफर करणाऱ्या मर्चंट बँकर आहेत तर लिंक इनटाइम इंडिया हे आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.

अलीकडे आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसने गौतम अदानी यांच्या समुहातील अदानी ग्रीन एनर्जीला तीन विशेष युनिट्स (एसपीव्ही) मधील आपला संपूर्ण इक्विटी हिस्सा विकला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग