सणासुदीला महागाई वाढणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव अनियंत्रित होणार नाहीत : अन्न सचिव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सणासुदीला महागाई वाढणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव अनियंत्रित होणार नाहीत : अन्न सचिव

सणासुदीला महागाई वाढणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव अनियंत्रित होणार नाहीत : अन्न सचिव

HT Marathi Desk HT Marathi
Published Sep 19, 2024 05:55 AM IST

महागाई : साखर, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात भाववाढ होण्याची शक्यता नाही.

सणासुदीला महागाई वाढणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव अनियंत्रित होणार नाहीत : अन्न सचिव
सणासुदीला महागाई वाढणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव अनियंत्रित होणार नाहीत : अन्न सचिव

आगामी सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत. म्हणजे महागाई वाढणार नाही. साखर, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात भाववाढ होण्याची शक्यता नाही. सरकारने ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गव्हाच्या वाटपात वाढ करण्याची घोषणा केली. ग्राहकांसाठी रास्त पातळीवर दर ठेवण्यास सरकार सक्षम आहे, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी बुधवारी सांगितले.

आगामी सणासुदीचा हंगाम चांगला राहील. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कोणतीही वाढ अपेक्षित नाही. खाद्यतेलाच्या किमतींचा उल्लेख करताना ते म्हणाले की, तेलाच्या दरात घसरण होत आहे. खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत कमी आहेत.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त गव्हाच्या

वाटपाचा 

उल्लेख करताना

चोप्रा म्हणाले की, मंत्र्यांच्या समितीने अतिरिक्त ३५ लाख टन गहू मंजूर केला आहे. वाढीव वाटप २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे या योजनेतील गहू-तांदूळ गुणोत्तर पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाच्या

साठ्याचा

उल्लेख करताना

अन्न सचिव म्हणाले की, शून्य शुल्कावर आयात केलेल्या १३ लाख टन खाद्यतेलांचा सध्या साठा आहे. हा साठा संपेपर्यंत सध्याच्या किमतीत विक्री करण्याच्या सूचना उद्योगांना देण्यात आल्या आहेत. साठा संपल्यानंतरही आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्याने शुल्कवाढीने किमती वाढणार नाहीत, असे ते म्हणाले. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर स्थिर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Whats_app_banner