Flipkart Sale: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी; फोल्डेबल फोनच्या खरेदीवर मोठी सूट!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी; फोल्डेबल फोनच्या खरेदीवर मोठी सूट!

Flipkart Sale: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी; फोल्डेबल फोनच्या खरेदीवर मोठी सूट!

Oct 28, 2024 09:12 PM IST

Infinix Zero Flip: फ्लिपकार्ट सेलमध्ये इनफिनिक्स झिरो फ्लिप स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे.

फोल्डेबल फोनच्या खरेदीवर मोठी सूट!
फोल्डेबल फोनच्या खरेदीवर मोठी सूट!

Infinix Zero Flip Price and Specifications: लोकप्रिय टेक ब्रँड इनफिनिक्सच्या वतीने त्याचा पहिला फ्लिप फोन इनफिनिक्स झिरो फ्लिप नुकताच लाँच करण्यात आला असून तो कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. या डिव्हाइसची खास वैशिष्ट्ये म्हणजे फोल्डेबल डिस्प्लेव्यतिरिक्त एआय सपोर्टसह ५० एमपी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ७० वॉट फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक प्रोसेसरसह कॉम्पॅक्ट डिझाइन देण्यात आले आहे.

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ग्राहकांना या लेटेस्ट फ्लिप फोनवर खास डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. या डिव्हाइसवर बँक डिस्काउंटचा फायदा दिला जात आहे.  या फोनच्या खरेदीवर ग्राहक एक्स्चेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. फोनमध्ये ५१२ जीबी स्टोरेज आणि ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. रॉक ब्लॅक आणि ब्लॉसम ग्लो या दोन कलर ऑप्शनमध्ये इनफिनिक्स झिरो फ्लिप 5G खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळत आहे.

इनफिनिक्स झिरो फ्लिप फोन ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला असून त्याची किंमत ४९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना फ्लिपकार्टवर ५००० रुपयांची सूट मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरतंर्गत ग्राहकांना २८ हजार २०० रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. ज्याची किंमत जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबून असते.

इनफिनिक्स डिव्हाइसमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.९ इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आहे. प्रायमरी डिस्प्लेला यूटीजी प्रोटेक्शन आणि कव्हर डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन मिळते. याशिवाय मीडियाटेक डायमेंसिटी ८०२० प्रोसेसरसह चांगला परफॉर्मन्स मिळतो. यात ५० एमपी मेन आणि ५० एमपी सेकंडरी सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि ५० एमपी सेल्फी कॅमेरा मिळतो. जेबीएल स्पीकर्ससह येणाऱ्या या फोनमध्ये ४ हजार ७२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यात ७० वॅट फास्ट चार्जिंग मिळत आहे.

इनफिनिक्स हॉट ५० प्रो बाजारात लॉन्च

इन्फिनिक्सने आपला नवा 4G फोन नुकताच जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन इनफिनिक्स हॉट ५० प्रो आहे. इन्फिनिक्सच्या नव्या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी१०० एसओसी प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. इनफिनिक्स हॉट ५० प्रो मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले असून ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी आयपी ५४ रेटिंग असून ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

Whats_app_banner