Infinix Zero Flip 5G Design and Specs Leaked: इन्फिनिक्स आपला फ्लिप फोन इन्फिनिक्स झिरो फ्लिप बाजारात लॉन्च करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा फोन खूप चर्चेत आहे. स्मार्टफोन ग्राहकही या फोनच्या लॉन्चिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीने अद्याप या फोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केलेली नसली तरी लवकरच तो बाजारात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, टिप्सटर पारस गुगलानी यांनी एक्स पोस्टमध्ये इन्फिनिक्स झिरो फ्लिपची किंमत आणि संभाव्य स्पेसिफिकेशन लीक करून ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, इन्फिनिक्स झिरो फ्लिपमध्ये कंपनी १०८०×२६४० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.९ इंचाचा एमोलेड डिस्प्ले देणार आहे. डिस्प्ले एलटीपीओ सपोर्टेड असेल आणि १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याशिवाय कंपनी या फोनमध्ये 1056×1066 पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ३.६ इंचाचा एमोलेड कव्हर डिस्प्ले देखील देणार आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल
हा फोन खूपच स्लिम असेल. त्याची जाडी फक्त ७.६४ मिमी असेल. तर, फोनची जाडी १६.०४ मिमी असेल, जी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ पेक्षा ४ मिमी जास्त आहे. फोन जाड होण्याचे कारण मोठी बॅटरी असल्याचे मानले जात आहे.
इन्फिनिक्स झिरो फ्लिपमध्ये ४ हजार ७२० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येणार आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स देणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ही मिळेल.
इन्फिनिक्स झिरो फ्लिप रॉक ब्लॅक आणि ब्लॉसम ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. फोनची किंमत ५० ते ५५ हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, याा फोनमध्ये तुम्हाला 5G, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.३, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय मिळतील. या फोनमध्ये ग्राहकांना प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंसिटी ८०२० चिपसेट मिळेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित एक्सओएस १४.५ वर काम करेल.