Infinix Zero 40 : भरमसाठ एआय फीचर्स आणि १६ जीबी रॅमसह बाजारात येतोय इन्फिनिक्सचा नवा फोन-infinix zero 40 5g to launch in india on september 18th with ai features ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infinix Zero 40 : भरमसाठ एआय फीचर्स आणि १६ जीबी रॅमसह बाजारात येतोय इन्फिनिक्सचा नवा फोन

Infinix Zero 40 : भरमसाठ एआय फीचर्स आणि १६ जीबी रॅमसह बाजारात येतोय इन्फिनिक्सचा नवा फोन

Sep 10, 2024 10:12 PM IST

Infinix Zero 40 5G Launch: इन्फिनिक्स लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन इनफिनिक्स झिरो ४० 5G असेल. इनफिनिक्स झिरो ४० 5G भारतात १८ सप्टेंबर रोजी लॉन्च होऊ शकतो.

इन्फिनिक्स लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत
इन्फिनिक्स लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत

Infinix Zero 40 5G to Launch in India: इन्फिनिक्स लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन इनफिनिक्स झिरो ४० 5G असेल, गेल्या महिन्यात हा फोन निवडक मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता लवकरच भारतात 5G मॉडेलच्या लॉन्चिंगवर शिक्कामोर्तब झाले आहे. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, इनफिनिक्स झिरो 5G च्या लॉन्चिंग डेटची माहिती मिळाली आहे. ९१ मोबाईल्सच्या रिपोर्टनुसार, इनफिनिक्स झिरो ४० 5G भारतात १८ सप्टेंबर रोजी लॉन्च होऊ शकतो. हा स्मार्टफोन दुपारी १२ वाजता लॉन्च होण्याची शक्यता असून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

फोनच्या टीझर इमेजमध्ये इन्फिनिक्स झिरो 5G फोन इनफिनिक्स एआयसह येणार असल्याचे दिसून येत आहे. या स्मार्टफोनमध्ये एआय इरेजर, एआय वॉलपेपर, एआय कट-आऊट स्टिकर्स, इमेज कटआऊटमधून स्टिकर्स तयार करता येतील. इनफिनिक्स झिरो ४० 5G फोनमध्ये एआय व्लॉग देखील असेल, जे सोशल मीडिया-रेडी व्लॉग तयार करण्यास मदत करते.

आगामी इनफिनिक्स झिरो ४० 5G मध्ये ग्लोबल व्हेरियंटसारखेच फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा एफएचडी+ एमोलेड डिस्प्ले असेल, ज्यात १,३०० निट्स पीक ब्राइटनेस असेल. फोनमध्ये ८ जीबी रॅम (८ जीबी व्हर्च्युअल रॅम) आणि ५१२ जीबी स्टोरेजसह मीडियाटेक हेलियो जी १०० प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

फोनमध्ये ओआयएससह १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा, ५० एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ एमपी डेप्थ सेन्सर आहे. तसेच फ्रंटमध्ये ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी असू शकते जी ४५ वॉट फास्ट चार्जिंग, २० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

इन्फिनिक्स नोट ४० प्रो रेसिंग एडिशन सीरिज लॉन्च

इन्फिनिक्सने आपल्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त नोट ४० प्रो रेसिंग एडिशन सीरिज नोट ४० प्रो सीरिजची खास आवृत्ती लॉन्च केली आहे.या व्हर्जनमध्ये इनफिनिक्स नोट ४० प्रो आणि नोट ४० प्रो+ या दोन मॉडेल्सचा समावेश आहे हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

इन्फिनिक्स नोट ४० प्रोचे ८ जीबी + २५६ जीबी रॅम आणि स्टोरेज मॉडेल १५ हजार ९९९ रुपयांना विकले जात आहे. तर, नोट ४० प्रो+ चा १२ जीबी + २५६ जीबी कॉन्फिगरेशन १८ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत बँक ऑफरचाही समावेश आहे.

दोन्ही मॉडेल्समध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा एफएचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ आहे.फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०२० प्रोसेसर आहे, ज्यात दोन कॉर्टेक्स-ए ७८ कोर आणि सहा कॉर्टेक्स-ए ५५ कोरसह ऑक्टा-कोर सेटअप आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०२० प्रोसेसर आहे, ज्यात दोन कॉर्टेक्स-ए ७८ कोर आणि सहा कॉर्टेक्स-ए ५५ कोरसह ऑक्टा-कोर सेटअप आहे. रियर कॅमेरा सेटअपमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह १०८ एमपी मुख्य सेन्सर, मॅक्रो आणि डेप्थ फोटोग्राफीसाठी दोन २ एमपी सेन्सर आहेत. फ्रंट कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे. नोट ४० प्रो मध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर, प्रो+ मॉडेलमध्ये १०० वॅट फास्ट चार्जिंगसह ४ हजार ६०० एमएएच बॅटरी आहे. दोन्ही मॉडेल्स २० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

Whats_app_banner
विभाग