मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infinix Smart 8 Plus: एआय ड्युअल कॅमेऱ्यासह इनफिनिक्सचा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च!

Infinix Smart 8 Plus: एआय ड्युअल कॅमेऱ्यासह इनफिनिक्सचा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 01, 2024 09:55 PM IST

Infinix Smart 8 Plus Launched in India: बजेट स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट ८ प्लस आज भारतात लॉन्च करण्यात आला आहे.

Infinix Smart 8 Plus Launched
Infinix Smart 8 Plus Launched (Infinix)

Infinix Smart 8 Plus:  इनफिनिक्सने आपला नवा बजेट स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट ८ प्लस भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मॅजिक रिंग, एआय ड्युअल रिअर कॅमेरा आणि बरेच काही देण्यात आले आहे. इनफिनिक्स स्मार्ट ८ सीरिजमध्ये स्मार्ट ८ आणि स्मार्ट ८ एचडीचा समावेश आहे. इनफिनिक्स स्मार्ट ८ प्लसची किंमत आणि किंमतीतबाबत जाणून घेऊयात.

इनफिनिक्स स्मार्ट ८ प्लसमध्ये ९० हर्ट्झ स्क्रीन रिफ्रेश रेटसह ६.६  इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स स्मार्ट ८ प्लसमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, जो एआय-समर्थित सेन्सरसह जोडला गेला आहे. कॅमेरा सेन्सरसोबतच फोनमध्ये क्वाड एलईडी रिंग फ्लॅश युनिट देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए१५ 5G स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

स्मार्टफोनमध्ये ६ हजार एमएएच बॅटरी आहे, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन कंपनीच्या एक्सओएस १३ वर चालतो, जो अँड्रॉइड व्हर्जन १३ वर आधारित आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइस 4G व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.

Samsung Galaxy S24 5G: 'अशी' ऑफर सध्या कुठेच नाही; सॅमसंग गॅलेक्सी एस २४ 5G वर अ‍ॅमेझॉनची मोठी सूट!

किंमत आणि फीचर्स

इनफिनिक्स स्मार्ट ८ प्लसच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री ९ मार्च २०२४ पासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

WhatsApp channel

विभाग