Infinix Smart 8 Plus: आघाडीचा टेक्नॉलॉजी ब्रँडने इनफिनिक्सने त्यांच्या स्मार्ट ८ प्लस स्मार्टफोनची विक्री सुरू करण्याची घोषणा केली. हा फोन आता फ्लिपकार्टवर केवळ ६ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्ट 8 प्लस मध्ये १८ वॅट टाइप सी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६ हजार एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली. स्मार्ट 8 प्लसमध्ये एक सुंदर टिंबर टेक्सचर फिनिश आहे, ज्यामुळे त्याच्या दिसण्यात परिष्कृततेचा स्पर्श जोडला गेला आहे. अचूक अभियांत्रिकी आणि विश्वासार्हतेसाठी कठोर चाचणीमुळे डिव्हाइस केवळ स्टायलिशच नाही तर टिकाऊ देखील आहे.
या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल एआय कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अशा फोटोंचा अनुभव घेता येणार आहे. फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
स्मार्ट ८ प्लसमध्ये ९० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. तसेच साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि चेहर्यावरील ओळख तंत्रज्ञान यासारखे प्रगत वैशिष्ट्ये आहेत जेणेकरून वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित राहील. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनमधील स्टोरेज २ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
इनफिनिक्स स्मार्ट 8 प्लस स्मार्टफोनची किंमत ग्राहकांना परवडणारी आहे. बजेटफ्रेंडली फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
संबंधित बातम्या