Infinix Hot 50i Launched In India: इन्फिनिक्सने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीच्या या नव्या फोनचे नाव इनफिनिक्स हॉट ५०आय असे आहे. फोनचे डिझाइन हॉट ५० मॉडेलच्या इतर फोनसारखेच आहे. कंपनीने हा फोन फिलिपिन्समध्ये लॉन्च केला आहे. या महिन्याच्या अखेरीस तो अधिक बाजारपेठांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
फोनची सुरुवातीची किंमत सुमारे ११० डॉलर (सुमारे ९,२०० रुपये) आहे. स्लीक ब्लॅक, सेज ग्रीन, टायटॅनियम ग्रे आणि ड्रीमी पर्पल या चार रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोनमध्ये कंपनी ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरसह अनेक उत्तम फीचर्स देत आहे. चला तर मग जाणून घेऊया याच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल.
इन्फिनिक्सच्या या फोनमध्ये १६००×७२० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले २०:९ च्या आस्पेक्ट रेशियोसह येतो. फोनचा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज चा पर्याय देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने युजर्स फोनची मेमरी २ टीबीपर्यंत वाढवू शकतात.
प्रोसेसर म्हणून फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हेलियो जी८१ चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएचची आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ओएसबद्दल बोलायचे झाले तर, फोन अँड्रॉइड १४ गो एडिशनवर आधारित इनफिनिक्सच्या एक्सओएस १४.० वर काम करतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, व्हीओएलटीई, यूएसबी टाइप-सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ ५.३ सारखे पर्याय असतील.
इन्फिनिक्सचा हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. याची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन १४ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत १ हजार रुपयांनी कमी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन १२ हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या फोनच्या १०८ मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्याव्यतिरिक्त १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देत आहे. फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचाचा आहे, जो फुल एचडी+ रिझोल्यूशनसोबत येतो.
संबंधित बातम्या