Infinix Hot 50 4G: इन्फिनिक्सने आपला नवा स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीच्या या नव्या डिव्हाइसचे नाव इन्फिनिक्स हॉट ५० 4G असे आहे. याच महिन्यात इन्फिनिक्सने या फोनचे 5G व्हेरियंट लॉन्च केले. फोनचे 4G व्हेरियंट नुकतेच युक्रेनमध्ये लॉन्च करण्यात आले. किंमत युएएच ६ हजार ८०० (सुमारे १३ हजार ५०० रुपये) आहे. फोनच्या 5G आणि 4G व्हेरियंटमध्ये प्रोसेसरशिवाय दुसरा कोणताही विशेष फरक नाही. 4G व्हेरियंट मीडियाटेक हेलियो जी १०० चिपसेटवर काम करतो. याशिवाय, या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेराही देण्यात आला आहे.
कंपनी या फोनमध्ये ६.७८ इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनेल देत आहे. फुल एचडी+ रिझोल्यूशन असलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. हा डिस्प्ले ८०० निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. फोनची डिझाईन अगदी हॉट ५० 5G सारखी आहे.
फोटोग्राफीसाठी बॅक पॅनेलवर पिल शेप कॅमेरा मॉड्यूल आहे, यामध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने युजर्स या फोनची मेमरी वाढवू शकतात. प्रोसेसर म्हणून यात तुम्हाला मीडियाटेक हेलियो जी १०० चिपसेट मिळेल.
फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएचची आहे. ही बॅटरी १८ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित एक्सओएस १४.५ आऊट ऑफ द बॉक्सवर काम करतो. कंपनी या फोनमध्ये एआय वॉलपेपर, एआय कटआऊट आणि एआय व्हॉईस कॅप्चर सारखे अनेक फीचर्स देत आहे. हा फोन स्लीक ब्लॅक, सेज ग्रीन आणि टायटॅनियम ग्रे या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.