Infinix Hot 40i specifications: इन्फिनिक्स कंपनी त्यांचा नवा फोन इन्फिनिक्स हॉट ४० आय भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. हा फोन येत्या १६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता लॉन्च होईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली. फोनची मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे. यामुळे या फोनची विक्री फ्लिपकार्टद्वारे केली जाईल, हे निश्चित झाले आहे. या फोनमध्ये १६ जीबी रॅम व्हर्च्युअल रॅम मिळत आहे. फोनमध्ये ग्राहकांना ३२ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
या फोनमध्ये ग्राहकांना ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात येणार आहे. फोनमध्ये ग्राहकांना १६ जीबी रॅम (८ जीबी रिअल रॅम आणि ८ जीबी व्हर्च्युअल) आणि २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. इन्फिनिक्स हॉट ४० आय फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
बायोमॅट्रिक सेक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड- फेसिंग सेंसर देणार आहे. फोनच्या बॅटरीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. कंपनी येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी फोनबाबत अधिकृत माहिती शेअर करणार आहे. या फोनची लाईव्ह फोटो ऑनलाइन लीक झाली आहे, ज्यात फोनचा रिअर लूक पाहिला जाऊ शकतो.या फोटोनुसार, फोनच्या बॅक पॅनलमध्ये ग्लॉसी फिनिश मिळणार असल्याची शक्यता आहे.
इन्फिनिक्स कंपनी लवकरच त्यांच्या नोट ४० सीरिज लॉन्च करणार आहे. यात इन्फिनिक्स नोट ४० आणि इन्फिनिक्स नोट ४० प्रोचा समावेश आहे. हा फोन ४५ वॅट आणि ७० वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल. या सीरिजमध्ये ग्राहकांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. तसेच फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश आहे.