Share Market Updates : खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेचा शेअर शुक्रवारी बीएसईवर १८ टक्क्यांनी घसरून १,०३४.७५ रुपयांवर पोहोचला. इंडसइंड बँकेच्या शेअरनं ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर झेप घेतली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर बँकेनं जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीचे निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत इंडसइंड बँकेचा एकत्रित निव्वळ नफा ३९.५ टक्क्यांनी घसरला आहे. या तिमाहीत १३३१ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २१८१ कोटी रुपये होता.
नफ्यात घट झाली असली तरी बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ५,३४७ कोटी रुपये झाली आहे. नफ्याचे प्रमुख निदर्शक असलेलं बँकेचं निव्वळ व्याज मार्जिन (NIM) गेल्या वर्षीच्या ४.२९ टक्क्यांवरून ४.०८ टक्क्यांवर घसरलं आहे.
जून तिमाहीत इंडसइंड बँकेची मालमत्तेची गुणवत्ता खालावली. जूनच्या तिमाहीत ग्रॉस एनपीए २.०२% ते २.११% होता, तर निव्वळ एनपीए ०.६% वरून ०.६४% होता. ग्रॉस एनपीए जूनमधील ७१२६.८ कोटी रुपयांवरून ७६३८.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर निव्वळ एनपीए जूनमधील २,०९५ कोटी रुपयांवरून २,२८२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जून तिमाहीच्या तुलनेत तरतुदी तब्बल ८७ टक्क्यांनी आणि ७३ टक्क्यांनी वाढून १,८२०.१ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिटही गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी घसरला आणि हळूहळू ९ टक्क्यांनी घसरून ३,५९९ कोटी रुपयांवर आला.
नफ्यात घट झाली असली तरी इंडसइंड बँकेचं कर्ज वितरण १३ टक्क्यांनी वाढून ३.५७ लाख कोटी रुपये झालं आहे. ठेवींमध्येही जोरदार वाढ झाली असून त्या १५ टक्क्यांनी वाढून ४.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.
नोमुरानं इंडसइंडच्या शेअरबाबत तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. मात्र, टार्गेट प्राइस १,५८० रुपयांवरून १,२२० रुपये केली आहे. कमकुवत तिमाही निकाल आव्हानात्मक असल्याचं नोमुरानं म्हटलं आहे.
मॅक्वेरीनं १,६९० रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवर आपलं ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवलं आहे.
सिटीनंही आपलं 'बाय' मानांकन कायम ठेवलं असले तरी टार्गेट प्राइस २,०१० रुपयांवरून १,६३० रुपयांवर आणलं आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२७ साठी उत्पन्नाचा अंदाज १८ ते २२ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
इंडसइंड बँकेच्या वाटचालीवर लक्ष ठेवून असलेल्या ५० विश्लेषकांपैकी ४१ विश्लेषकांनी शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे, आठ जणांनी 'होल्ड' तर एकानं विक्रीचा सलाल दिला आहे. इंडसइंड बँकेचा शेअर आता (११.५५ मिनिटांनी) १९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून १०२८ वर ट्रेड करत आहे.
संबंधित बातम्या