याला म्हणतात पाचही बोटे तुपात! दोन आठवड्यांत २२ टक्क्यांनी वाढला शेअर; आता कंपनीची बोनस शेअर्सची तयारी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  याला म्हणतात पाचही बोटे तुपात! दोन आठवड्यांत २२ टक्क्यांनी वाढला शेअर; आता कंपनीची बोनस शेअर्सची तयारी

याला म्हणतात पाचही बोटे तुपात! दोन आठवड्यांत २२ टक्क्यांनी वाढला शेअर; आता कंपनीची बोनस शेअर्सची तयारी

Dec 10, 2024 11:49 AM IST

Indraprastha Gas Ltd Share Price : इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे शेअर्स आज तेजीत आहेत. कंपनीकडून शेअरहोल्डर्सना बोनस जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यांत २२ टक्क्यांनी वाढला शेअरचा भाव; आता कंपनी बोनस शेअर्स देण्याची शक्यता
दोन आठवड्यांत २२ टक्क्यांनी वाढला शेअरचा भाव; आता कंपनी बोनस शेअर्स देण्याची शक्यता

Share Market Update Today : गॅस वितरक कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या शेअर्सची आज जोरदार चर्चा आहे. हा शेअर अवघ्या दोन आठवड्यांत २२ टक्क्यांनी वाढला असून आता कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट देण्याची शक्यता आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, १० डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत बोनस शेअरचा निर्णय घेतला जाणार आहे. परिणामी कंपनीच्या शेअर्समध्ये आज सकाळी तेजी पाहायला मिळाली. आज बीएसईवर कंपनीचा शेअर ३८९.७५ रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीचा शेअर ०.८५ टक्क्यांनी वधारून ३८८.८० रुपयांवर (सकाळी ११.२५ वाजता) पोहोचला.

२०१७ मध्ये झाला होता स्प्लिट

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे शेअर्स २०१७ मध्ये स्प्लिट झाले होते. त्यावेळी कंपनीचे शेअर्स ५ भागांमध्ये विभागले गेले. शेअर्सच्या विभाजनानंतर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या शेअर्सचं अंकित मूल्य दोन रुपयांपर्यंत घसरलं आहे.

या वर्षी दोनदा दिलाय लाभांश 

कंपनीच्या समभागांनी या वर्षी दोन वेळा लाभांश दिला आहे. कंपनीनं यावर्षी १३ सप्टेंबर रोजी प्रथमच एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार केला. कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५ रुपये लाभांश दिला होता. तर याच वर्षी दुसऱ्यांदा नोव्हेंबर महिन्यात कंपनीनं डिविडंड जाहीर केला होता. तो प्रति शेअर ५.५० रुपये इतका होता.

कशी आहे शेअरची वाटचाल?

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचा शेअर गेल्या वर्षभरात २ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत १६.४१ टक्क्यांनी घसरली आहे. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बाब म्हणजे गेल्या २ आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५७० रुपये आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३०६.५० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner