IPO Listing : नव्या वर्षाची सुरुवात नफ्याने! मेन बोर्डच्या पहिल्या आयपीओनं लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दिला २१ % नफा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : नव्या वर्षाची सुरुवात नफ्याने! मेन बोर्डच्या पहिल्या आयपीओनं लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दिला २१ % नफा

IPO Listing : नव्या वर्षाची सुरुवात नफ्याने! मेन बोर्डच्या पहिल्या आयपीओनं लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दिला २१ % नफा

Jan 07, 2025 01:11 PM IST

Indo Farm Equipment IPO Listing : नव्या वर्षातील पहिल्या मेन बोर्ड आयपीओची लिस्टिंग इंडो फार्म इक्विपमेंटच्या शेअरच्या रुपात आज झाली. पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना २० ते २१ टक्के नफा झाला.

IPO Listing : लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आयपीओनं दिला २१ टक्के नफा, किती झाला शेअरचा भाव? वाचा
IPO Listing : लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आयपीओनं दिला २१ टक्के नफा, किती झाला शेअरचा भाव? वाचा

IPO Listing News : कृषी उत्पादनांशी संबंधित अवजारे बनविणाऱ्या इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जोरदार लिस्टिंग झाली. कंपनीचे शेअर्स २५८.४० रुपयांवर सूचीबद्ध झाले. आयपीओतील २१५ रुपयांच्या किंमतीपेक्षा ही किंमत २१ टक्के अधिक आहे. एनएसईवर हा शेअर १९ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह २५६ रुपयांवर लिस्ट झाला. या वर्षातील ही पहिलीच मेन बोर्ड आयपीओ लिस्टिंग आहे.

इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ गुरुवारी निविदेच्या शेवटच्या दिवसापर्यंत २२७.५७ पट सब्सक्राइब करण्यात आला होता. एनएसईच्या आकडेवारीनुसार, २६० कोटी रुपयांच्या आयपीओत ८४,७०,००० शेअर्सची ऑफर होती. प्रत्यक्षात १,९२,७५,४९,२९३ शेअर्ससाठी बोली लागली होती. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ५०१.६५ पट सब्सक्राइब झाला. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) कोटा २४२.४० पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) श्रेणीत हा आयपीओ १०१.६४ पट सब्सक्राइब झाला.

इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ मंगळवारी निविदेच्या पहिल्या दिवशी १७.७० पट सब्सक्राइब झाला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ७८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली होती. आयपीओसाठी किंमत पट्टा २०४ ते २१५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव होता. 

२६० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ८६ लाख इक्विटी शेअर्सचे नवे इश्यू आणि प्रवर्तक रणबीरसिंग खडवालिया यांनी ३५ लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS)चा समावेश होता. इंडो फार्म इक्विपमेंट ट्रॅक्टर, पिक अँड कॅरी क्रेन आणि इतर कृषी उपकरणं बनवते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner