IndiGo ची ख्रिसमसनिमित्त जबरदस्त ऑफर..! ट्रेनच्या तिकीटात करा विमान प्रवास, केवळ दोनच दिवस संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IndiGo ची ख्रिसमसनिमित्त जबरदस्त ऑफर..! ट्रेनच्या तिकीटात करा विमान प्रवास, केवळ दोनच दिवस संधी

IndiGo ची ख्रिसमसनिमित्त जबरदस्त ऑफर..! ट्रेनच्या तिकीटात करा विमान प्रवास, केवळ दोनच दिवस संधी

Dec 24, 2024 06:59 PM IST

Indigo Gataway Sale : इंडिगो एअरलाइनने आपला Getaway Sale लाँच केला आहे. ज्यामध्ये तुम्ही केवळ ११९९ रुपयांपासून फ्लाइट तिकीट बुक करु शकता.

IndiGo ची ख्रिसमसनिमित्त जबरदस्त ऑफर..!
IndiGo ची ख्रिसमसनिमित्त जबरदस्त ऑफर..!

IndiGo Getaway Sale : नव्या वर्षात मित्र व कुटूंबासोबत कोठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात, मात्र महागड्या हवाई तिकीटांनी त्रस्त झाला आहात, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही ट्रेनच्या स्लीपर कोचच्या तिकीटात हवाई प्रवास करू शकणार आहेत. IndiGo एअरलाइनने आपला Getaway Sale लाँच केला आहे. ज्यामध्ये तुम्ही केवळ ११९९ रुपयांपासून फ्लाइट तिकीट बुक करु शकता. इतकेच नाही तर फेडरल बँकेचे ग्राहक ५००० रुपयांपर्यंतची बचतही करु शकतात.

IndiGoने जाहीर केला Getaway Sale

इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी खास Getaway Sale जाहीर केला आहे. ज्य़ामध्ये केवळ ११९९ रुपयांपासून डोमॅस्टिक फ्लाइटची तिकीटे मिळतील, त्याचबरोबर ४४९९ रुपयांपासून आंतरराष्ट्रीय प्रवासही करू शकता. या सवलतीमध्ये एअरपोर्ट चार्जेस आणि सरकारी टॅक्सचा समावेश करण्यात आलेला नाही.

केवळ २ दिवसांसाठी ऑफर -

इंडिगोची ही ऑफर केवळ २५ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे तातडीनं तिकीट बुकींग करणाऱ्यांचा या ऑफरचा फायदा मिळणार आहे. २५ डिसेंबरपर्यंत तिकीट बुकिंग केल्यास कमी तिकीट दरात २३ जानेवारी ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान कुठेही प्रवास करता येणार आहे. या सवलतीच्या काळात विमान प्रवासाची तिकीटे ११९९ रुपयांपासून उपलब्ध असणार आहेत, तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं तिकीट केवळ ४४९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. स्वस्त तिकिटांसह इंडिगोकडून काही काही कार्ड धारकांना १५ टक्क्यांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

इंडिगोच्या या खास ऑफरमध्ये फेडरल बँकेच्या ग्राहकांची ५००० रुपयांपर्यंती बचत होणार आहे. तसेच प्रवाशांना निवडक 6E Add-ons वर १५ टक्के सवलत मिळणार आहे. केवळ ५९९ रुपयात XL सीटही मिळू शकते. देशांतर्गत प्रवासासाठी ही सवलत १५ टक्के असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 टक्के इतकी सवलत लागू असेल.

Whats_app_banner