सरकारने चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपी (India Q3 GDP) चे आकडे प्रसिद्ध केले आहेत. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) सुसाट गतीने धावत आहे. दरम्यान सरकारने सांगितले आहे की, तिसऱ्या तिमाहीत देशाची जीडीपी वृद्धी दर ८.४ टक्क्यांनी वाढला आहे. इकोनॉमीचे हे आकडे अंदाजापेक्षा चांगले आहेत. देशात मॅन्युफॅक्चरिंग एक्टिविटीज आणि सरकारी खर्चात तेजी असल्याने GDP चा वेग चागला आहे. याच्या मागच्या तिमाहीत जीडीपी वृद्दीदर ७.६ टक्के होता.
भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक बँकेने कौतुक केले आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २९ फेब्रुवारीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन वेगाने वाढले आहे. वर्ष-दर-वर्ष ८.४ टक्क्यांचा हा वृद्धीदर २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीनंतरचा सर्वात चांगला वृद्धीदर आहे. जो ६.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा खूप अधिक आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या या वृद्धीला पाहून NSO ने आपल्या दुसऱ्या पूर्वानुमानात आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी देशाची जीडीपी वृद्धी दर ७.६ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पूर्वानुमानात चालू आर्थिक वर्षात GDP Growth Rate ७.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.