अदानी समूहावरील आरोपांनंतर भारतीय बँका सावध! कर्जावरील जोखमीचा अंदाज घेण्यास सुरुवात
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अदानी समूहावरील आरोपांनंतर भारतीय बँका सावध! कर्जावरील जोखमीचा अंदाज घेण्यास सुरुवात

अदानी समूहावरील आरोपांनंतर भारतीय बँका सावध! कर्जावरील जोखमीचा अंदाज घेण्यास सुरुवात

HT Marathi Desk HT Marathi
Nov 28, 2024 06:27 PM IST

Adani Group Risk Review : सातत्यानं गैरप्रकाराच्या आरोपांचा सामना करणारा गौतम अदानी समूह आता भारतीय बँकांच्या रडारवर आला आहे.

अदानी
अदानी

Indian banks on adani group : अमेरिकेतील न्यायालयानं अदानी समूहावर लाचखोरी व फसवणुकीचा ठपका ठेवल्यानंतर भारतीय बँका सावध झाल्या आहेत. स्टेट बँकेसह देशातील अन्य बँकांनी अदानी समूहाला दिलेल्या कर्जाच्या जोखमीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं आठ बँकर्सच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. त्यानुसार, नवीन कर्ज देताना अदानी समूहाला नियम कडक करण्याची आवश्यकता आहे की नाही हे कर्जदार तपासत आहेत. अर्थात, या पुनरावलोकनामुळं अदानी समूहाला कर्ज देण्याच्या दृष्टिकोनात लगेच काहीही बदल होणार नाही. बँकिंग व्यवस्थेनं घाबरून जाण्याची गरज नाही, कारण सध्या कोणत्याही संस्थेनं अदानी समूहाला मर्यादेबाहेर कर्ज दिलेलं नाही, असं या घडामोडींची माहिती असलेल्या नियामक सूत्रांनी सांगितलं. रॉयटर्सनं या संदर्भात केलेल्या मेलला रिझर्व्ह बँकेनं कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

ब्रोकरेज फर्म आयआयएफएल सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, भारतीय बँकांपैकी एसबीआयनं अदानी समूहाला सर्वाधिक कर्ज दिलं आहे. या कर्जाचं मूल्य ३३,८०० कोटी रुपये (४ अब्ज डॉलर्स) आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय अदानीच्या चालू प्रकल्पांना कर्ज देणं थांबवणार नाही. मात्र, समूहाकडून सर्व अटी व शर्तींची पूर्तता केली जात आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी बँक कर्ज वाटप करताना सावधगिरी बाळगणार आहे.

Whats_app_banner