नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये भारतातील किरकोळ महागाई दर ३.६५ टक्के होता. हे रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या आत आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर ३.६० टक्के होता.
बातम्या अद्ययावत होत आहेत