कोण म्हणतं भारत गरीब आहे! अब्जाधीशांची यादी बघा, जगात गाजतंय नाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  कोण म्हणतं भारत गरीब आहे! अब्जाधीशांची यादी बघा, जगात गाजतंय नाव

कोण म्हणतं भारत गरीब आहे! अब्जाधीशांची यादी बघा, जगात गाजतंय नाव

Dec 09, 2024 10:40 AM IST

India ranks third in worlds billionaires : भारतातील अब्जाधीशांची संख्या तब्बल १८५ झाली आहे. अमेरिका आणि चीननंतर ही सर्वाधिक संख्या आहे. एवढेच नव्हे तर वर्षभरात या अब्जाधीशांच्या संपत्तीतही ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर! संपत्तीत वर्षभरात झाली ४२ टक्के वाढ
जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर! संपत्तीत वर्षभरात झाली ४२ टक्के वाढ

India ranks third in worlds billionaires : भारत जगात विविध क्षेत्रात अग्रेसर होऊ लागला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत देखील भारताचा क्रमांवर तालिकेत वरच्या स्थानावर आला आहे.  भारतातील अब्जाधीशांची संख्या १८५ झाली असून  अमेरिका व चीननंतर ही सर्वाधिक संख्या आहे. एवढेच नव्हे तर वर्षभरात या अब्जाधीशांच्या संपत्तीतही ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील रेटिंग एजन्सी यूबीएसच्या अब्जाधीश महत्त्वाकांक्षा अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

दहा वर्षात दुपट्टीने वाढले अब्जाधीश 

अब्जाधीशांच्या अहवालानुसार, भारतात वर्षभरात ३२ नव्या अब्जाधीशांची नावे वाढली आहेत. २०१५  पासून देशातील अब्जाधीशांची संख्या दुपटीने वाढली आहे. अहवालात म्हटले आहे की, "यावरून भारताची आर्थिक क्षेत्रात वेगाने वाटचाल होत असल्याचं दिसून येत आहे.  त्यामागे पारंपरिक व्यवसायात व नव्या क्षेत्रात प्रगती करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे आहे. व्यवसाय क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या वाढीचा यात मोलाचा वाटा आहे. 

पुढच्या दशकात भारत करणार चीनची बरोबरी 

पुढील दशकात भारतातील अब्जाधीशांची संख्या चीनएवढी होईल, असा अंदाज आहे.  दरम्यानच्या काळात चीनमधील अब्जाधीशांमध्येही घट होत आहे. अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या ८३५ तर चीनमध्ये ४२७ आहे. यावर्षी अमेरिकेतील अब्जाधीशांच्या यादीत ८४ जणांचा समावेश झाला आहे. मात्र, चीनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत घट दिसून आली. चीनमध्ये वर्षी ९३ अब्जाधीश कमी झाले आहेत. तर जागतिक स्तरावर अब्जाधीशांची संख्या २०१५  मध्ये १७५७ वरून २०२४  मध्ये २६८२ वर पोहोचली आहे.

यामुळे वाढती आहे संख्या 

तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीशांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. २०१५  मध्ये त्यांची संपत्ती ७८८.९ अब्ज डॉलर होती, जी आता ३  पटीने वाढून २०२४  मध्ये २.४ ट्रिलियन डॉलर झाली आहे. जेनेरेटिव्ह एआय, सायबर सिक्युरिटी, फिनटेक आणि रोबोटिक्स मधील वाढीमुळे ही वाढ झाली आहे.  रिअल इस्टेट अब्जाधीशांची संपत्ती हरित तंत्रज्ञानातील गुंतवणुकीमुळे ४८०.४ अब्ज डॉलरवरून १.३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. याउलट, रिअल इस्टेट अब्जाधीश मागे पडले. चीनच्या मालमत्ता सुधारणा, व्यावसायिक रिअल इस्टेटवर महामारीचा परिणाम आणि अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या व्याजदरांचा फटका बसला.

Whats_app_banner