मराठी बातम्या  /  बिझनेस  /  TAX consultant ; करसल्लागार, सीए यांच्या मागणीत वाढ, जाणून घ्या नेमके कारण

TAX consultant ; करसल्लागार, सीए यांच्या मागणीत वाढ, जाणून घ्या नेमके कारण

Apr 04, 2023 06:10 PM IST

TAX consultant ; आर्थिक वर्ष २०२३ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आणि इन्कम टॅक्स सल्लागार यांच्या मागणीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

TAX HT
TAX HT

TAX consultant ; आर्थिक वर्ष २०२३ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आणि इन्कम टॅक्स सल्लागार यांच्या मागणीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या याच तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत मागणीत ४७% वाढ दिसून आली. इंदौर (७२%), चंदीगड (७१%) आणि लखनौ (५९%) सारख्या बिगर मेट्रो मध्ये याच कालावधीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सर्च इंजिन जस्टडायलने अहवालात नमूद करण्यात आले आहे की आर्थिक वर्ष २०२२ च्या याच तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत मागणीत ४७% वाढ दिसून आली. इंदौर (७२%), चंदीगड (७१%) आणि लखनौ (५९%) सारख्या बिगर मेट्रोमध्ये याच कालावधीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे.

कोविडनंतर मागणीत

अहवालानुसार कोविड नंतर आर्थिक क्रियाकलाप पुन्हा सुरू झाल्यामुळे आर्थिक व्यावसायिकांच्या मागणीत वाढ झाली आहे आणि कर परताव्यासाठी जानेवारी ते जून हा महत्त्वाचा काळ आहे. सरकार करप्रणाली सुलभ करत असताना, दोन कर पद्धतींचा पर्याय आणि कर आकारणी कायद्यांचे गुंतागुंतीचे तपशील यामुळे कर भरताना तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक ठरत आहे.

अपेक्षेप्रमाणे, अहवालात विशेषत: कर्नाळ (३६%), मंगलोर (२२%) आणि सुरत (१५%) सारख्या बिगर मेट्रो शहरांमध्ये आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाही पासून आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाही पर्यंत सर्चमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. टियर-१ शहरांमध्ये, चेन्नईमध्ये १२% वाढ झाली आहे, तर अहमदाबादमध्ये १०% वाढ झाली आहे. मागणीतील ही वाढ जून-जुलैपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे.

"आमच्या अनुभवानुसार कारण लोक अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे कर विवरणपत्र भरण्यासाठी घाई करत असल्यामुळे एप्रिलच्या मध्यात वित्त व्यावसायिकांची मागणी वाढते. आमची फर्म प्रामुख्याने किरकोळ ग्राहक, फ्रीलांसर आणि ज्यांची उलाढाल १० ते ३० कोटी महसूलाची आहे अशा छोट्या कंपन्यांना सेवा देते," असे चेन्नईच्या व्ही.एस संथासीलन आणि असोसिएट्सचे प्रवर्तक संथासीलन म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "स्टार्टअप परिसंस्थेची भरभराट होत असताना कर अनुपालन आणि इतर आर्थिक बाबींवर मार्गदर्शन मिळवणाऱ्या नवीन व्यवसायांकडून सीए/आयटी सल्लागारांच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुधारत असताना आणि अधिकाधिक व्यवसाय बाजारपेठेत येत असताना येत्या काही वर्षांत वित्त व्यावसायिकांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे."

कोविड-१९ साथीच्या आजारामुळे अनेक व्यावसायिक फ्रीलान्स कामाकडे वळले किंवा त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळेही मागणी आणखी वाढली आहे. डिजिटायझेशन आणि करचोरी रोखण्यावर सरकारचे लक्ष यामुळे व्यवसायांनी आणि व्यक्तिगत पातळीवर दंड टाळण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक बनले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असताना चार्टर्ड अकाउंटंट आणि आयकर सल्लागारांची मागणी येत्या काही वर्षांत कायम राहणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग