मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITR Filing : नोकरदारांसाठी ITR फाॅर्म खुला, जूनी की नवी करप्रणाली, कोणती प्रणाली करावी सिलेक्ट इथे पाहा

ITR Filing : नोकरदारांसाठी ITR फाॅर्म खुला, जूनी की नवी करप्रणाली, कोणती प्रणाली करावी सिलेक्ट इथे पाहा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 24, 2023 09:06 AM IST

ITR Filing : वैयक्तिक, प्रोफेशनल्स आणि छोट्या व्यावसायिकांसारख्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी. आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयकर रिटर्न्स फाॅर्म १ आणि ४ आॅनलाईन भरण्याची सुविधा सुरु केली आहे.

Income tax HT
Income tax HT

ITR Filing : वैयक्तिक, प्रोफेशनल्स आणि छोट्या व्यावसायिकांसारख्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी. आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयकर रिटर्न्स फाॅर्म १ आणि ४ आॅनलाईन भरण्याची सुविधा सुरु केली आहे. डिपार्टमेंटने ट्विटरवर लिहिले आहे की, इतर इनकम टॅक्स रिटर्न्स / फाॅर्म्स सुविधा लवकरच सुरु केली जाईल.

आयकर खात्याने एका ट्विटर यूजर्सला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, ई फायलिंग पोर्टलवर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आॅनलाईन आयटीआर फाॅर्म १ आणि ४ भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२२ - २३ साठी ज्या लोकांच्या खात्याचे आँडीट आवश्यक नाही त्यांच्यासाठी टॅक्स रिटर्न्स भरण्याची अतिम मुदत ३१ जूलै आहे.

पगारदारांसाठी फाॅर्म १

आयटीआर फाॅर्म १ सॅलरीड आणि ज्येष्ठ नागरिकासहित अन्य व्यक्ती भरतात. तर आयटीआर फाॅर्म २ कंपन्या आणि व्यावसायिक भरतात. हा पर्याय ज्या कंपन्यांनी अंदाजे कर आकारणीचा पर्याय स्विकारला आहे त्यांसाठी आहे. या कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांपेक्षा अधिक नाही.

जूनी करप्रणाली करावी लागेल 'सिलेक्ट'

चालू आर्थिक वर्षात करदात्यांची निवड आपोआपच नव्या कर प्रणाली अंतर्गत होणार आहे. यात ७ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. तिथे गुंतवणूकीवर कर सवलत मिळणार नाही. जर तुम्ही कर बचतीच्या पर्याय निवडून गुंतवणूक केली असेल तर जूनी कर प्रणालीचा पर्याय निवडावा लागेल. तेच तुमच्या फायद्याचे ठरेल. जून्या कर प्रणालीअंतर्गतच तुम्हाला कर सवलत मिळेल.यासाठी तुम्हाला पर्याय निवडावा लागेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग