Small Savings Scheme: भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि जेष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यांसारख्या लहान बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार, लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना त्यांचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा संबंधित बँकेच्या शाखेत जमा करणे अनिवार्य आहे. ठेवीदारांना त्यांचा आधार क्रमांक ३० सप्टेंबरपूर्वी बँकेत जमा करावा लागेल, अन्यथा त्यांचे लहान बचत खाते गोठवले जाऊ शकते.
एखाद्या व्यक्तीने पोस्टात किंवा कोणत्याही बँकेत लहान बचत खाते उघडले आहे. परंतु, त्यांनी अद्यापही त्यांचा आधार क्रमांक दिला नाही. अशा ठेवीदारांना १ एप्रिल २०२३ पासून पुढील सहा महिन्याच्या आत आधार क्रमांक जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. आधार क्रमांक जमा करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. यानंतर ठेवीदाराचे खाते गोठवले जाऊ शकते. तसेच त्याचे खाते आधार क्रमांक देऊपर्यंत निष्क्रीय राहील. ज्यामुळे ठेवीदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लहान बचत योजनांसाठी आधार आणि पॅन क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे.
- तुम्ही गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर व्याज मिळणार नाही.
- पीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेता लाभ घेता येणार नाही.
- मॅच्युरिटी रक्कम खात्यात जमा होणार नाही.
संबंधित बातम्या