Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार-if your account is in pnb then it may be closed after a month ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

May 08, 2024 11:20 AM IST

Bank News : बँकेत खातं उघडून त्यात अनेक वर्षे व्यवहार न करणाऱ्या ग्राहकांची खाती बंद करण्याचा निर्णय पंजाब नॅशनल बँकेनं घेतला आहे.

'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार
'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

PNB Bank News : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार असाल आणि तुमच्या खात्यात काही शिल्लक नसेल किंवा तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, महिनाभरानंतर तुमचं ते खातं थेट बंद होणार आहे.

निष्क्रिय पडून राहिलेल्या खात्यांचा गैरवापर होऊ नये व जोखीम कमी व्हावी म्हणून हे पाऊल उचलण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, ही तीन वर्षे ३० एप्रिलपर्यंत मोजली जातील.

कोणती खाती बंद होणार नाहीत!

डिमॅट खात्यांशी जोडलेली खाती, लॉकर्स, २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसह विद्यार्थ्यांची खाती, अल्पवयीन मुलांची खाती, SSY/PMJJBY/PMSBY/APY, DBT सारख्या उद्देशांसाठी उघडलेली खाती आणि कोर्ट, आयकर विभाग किंवा इतर कोणत्याही वैधानिक प्राधिकरणाच्या आदेशानं गोठवलेली खाते बंद केली जाणार नाहीत.

अनिवासी भारतीयांना वापरता येणार UPI

खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआयनं अनिवासी भारतीयांना भारतात UPI पेमेंट करण्यासाठी त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर वापरण्याची परवानगी दिली ​​आहे. बँकेचे परदेशी ग्राहक कोणताही भारतीय QR कोड, UPI ID स्कॅन करून किंवा कोणताही भारतीय मोबाइल नंबर वापरून UPI ​​पेमेंट करू शकतात.

या सुविधेमुळं दैनंदिन पेमेंट करण्याच्या त्यांच्या सोयीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बँकेनं म्हटलं आहे. या सुविधेसह बँकेचे परदेशातील ग्राहक त्यांच्या बिलं, व्यावसायिक आणि ई-कॉमर्स व्यवहारांसाठी भारतातील आयसीआयसीआय बँकेतील त्यांच्या NRE/NRO बँक खात्यात नोंद असलेल्या आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकासह पेमेंट करू शकतात.

NPCI ची मदत

बँकेनं आपल्या मोबाईल बँकिंग ॲप iMobile Pay द्वारे ही सेवा प्रदान केली आहे. याआधी अनिवासी भारतीयांना UPI पेमेंट करण्यासाठी त्यांच्या बँकांमध्ये भारतीय मोबाइल नंबरची नोंदणी करावी लागत होती. या सेवेसाठी ICICI बँकेनं देशभरात UPI च्या सोयीस्कर वापरासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांचा लाभ घेतला आहे. आयसीआयसीआय बँक ही सेवा अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया या दहा देशांमध्ये पुरवते.

Whats_app_banner
विभाग