Early retirement : वयाच्या ४५ वर्षी निवृत्त होण्याचा प्लान असेल तर या बाबी ध्यानात ठेवा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Early retirement : वयाच्या ४५ वर्षी निवृत्त होण्याचा प्लान असेल तर या बाबी ध्यानात ठेवा

Early retirement : वयाच्या ४५ वर्षी निवृत्त होण्याचा प्लान असेल तर या बाबी ध्यानात ठेवा

Nov 13, 2022 07:23 PM IST

Early retirement : धकाधकीचे जीवन, मानसिक ताण यांमुळे आजकाल लवकर निवृत्ती घेण्याची क्रेझ अलिकडच्या काळात वाढली आहे. अनेकजण वयाच्या ४५ वर्षातच निवृत्ती घेण्याचे प्लानिंग करतात. तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल तर 'या' बाबींचे आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे ठरते.

retirement plan
retirement plan

Early retirement : आजच्या जमान्यात असे बरेच जण आहेत की ज्यांना वयाच्या ६० पर्यंत काम करण्याची इच्छा नाही. फास्ट लाईफ हे यामागचं प्रमुख कारण. त्यामुळेच अनेकजण वयाच्या ४५ व्या वर्षी सेवानिवृत्ती घेण्याचे नियोजन करतात.

तुम्हीही लवकर सेवानिवृत्ती घेण्याचा विचार करत असाल तर त्याचे फूलप्रुफ प्लानिंग आत्ताच करा. किंबहुना आताच त्यासाठीची आर्थिक गणिते बांधायला सुरुवात करणे फायद्याचे ठरेल. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या कमाईतील ७० टक्के बचत करावी लागेल. जेणेकरुन निवृत्तीनंतर तुमच्याकडे पै-पै- पैसे जमा राहतील. ते लहान लहान भागांमध्ये जमा करा. जर तुम्ही लवकर निवृत्तीचा विचार करत असाल तर या ६ बाबी लक्षात ठेवा.

अधिक बचत करा

जर तुम्हाला लवकर निवृत्ती घ्यायची असेल आणि सध्या तुमचे वय ३० वर्षे असेल, तर तुमच्याकडे पुढील १५ वर्षे आहेत. या उर्वरित पंधरा वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक पैसा बचतीवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.खर्चापेक्षा बचतीकडे कल अधिक असावा लागेल. कारण या काळात जमा केलेला पैसा तुम्हाला पुढील ३० वर्षे टिकला पाहिजे. त्यासाठी बचत आतापासून सुरू करावी लागेल. या कारणास्तव, तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील ७० टक्के बचत करावी लागेल.

मेडिकल कव्हर

हेल्थ इन्शुरन्स तुमच्यासाठी असणे आवश्यक आहे. आरोग्य विमा देखील महत्वाचा आहे. कारण वृद्धापकाळात अचानक उद्भवलेल्या आजारपणात त्याची मदत होते.

खर्चावर नियंत्रण ठेवा

लवकर निवृत्तीनंतर तुमचे आयुष्य चांगले जावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आजच्या काळात होत असलेल्या अतिरिक्त खर्चाची जाणीव ठेवून बचत करायला हवी.

सुट्ट्यांमधील पर्यटनासाठी अतिरिक्त पैसे

जर तुम्हाला निवृत्तीनंतर खूप प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. ते स्वतंत्रपणे जतन करावे लागेल. यासाठी तुम्ही स्वतंत्रपणे काही कामही करू शकता.

शिस्तबद्ध असणे खूप महत्वाचे

भविष्यातील आर्थिक नियोजन करताना तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आतापासूनच तुमच्या जीवनात शिस्तबद्धता आणि व्यावहारिकपणा राखावी लागेल. जर तुम्ही तुमच्या ध्येयापासून एकदाही विचलित झालात तर तुम्ही नेहमी त्यापासून विचलित व्हाल.

निश्चित रक्कम काढा

तुम्ही निवृत्त झाल्यावर तुमच्या निधीतील ठराविक रक्कम काढणे आवश्यक आहे. उरलेली रक्कम त्या खात्यातच राहू द्यावी. जेणेकरून तुमच्याकडे असलेली रक्कम वाढतच जाते आणि तुमचे पैसे दीर्घकाळ टिकतील.

Whats_app_banner