तुम्ही आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  तुम्ही आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

तुम्ही आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 13, 2024 04:56 PM IST

ICICI bank Credit Card : आयसीआयसीआय बँकेनं क्रेडिट कार्ड शुल्कात अनेक महत्त्वाचे बदल केले असून ते १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

जर तुम्ही या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे
जर तुम्ही या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे

आयसीआयसीआय बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड शुल्कात महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल १५ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणार आहेत. या बदलामध्ये फायनान्स चार्ज, लेट पेमेंट चार्जेस, शिक्षणासाठी अतिरिक्त ट्रान्झॅक्शन फी आणि इंधनासाठी अतिरिक्त ट्रान्झॅक्शन फीचा समावेश आहे. 

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी नोव्हेंबरच्या मध्यापासून विस्तारित क्रेडिट आणि रोख अ‍ॅडव्हान्सवरील वित्तीय शुल्क आता ३.७५ टक्के मासिक दराने लागू होईल. जे वार्षिक ४५ टक्के दराइतके आहे. हे थकीत शिल्लक आणि क्रेडिट कार्डवरील कोणत्याही आगाऊ रोख रकमेवरील थकीत व्याजावर लागू होते.

लेट पेमेंट फी

आयसीआयसीआय बँकेनं थकित रकमेच्या आधारे विलंब शुल्काची पुनर्रचना केली आहे. हे शुल्क १०१ ते ५०० रुपयांपर्यंतच्या बॅलन्ससाठी १०० रुपये तर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी १३०० रुपयांपर्यंत असेल. १०० रुपयांपेक्षा कमी शिल्लक कोणत्याही विलंब देय शुल्कापासून मुक्त राहते.

शैक्षणिक व्यवहार

आंतरराष्ट्रीय शिक्षण शुल्कासह थेट शाळा किंवा महाविद्यालयांना दिलेल्या देयकांवर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. तथापि, थर्ड पार्टी अ‍ॅपच्या माध्यमातून भरलेल्या शिक्षणाशी संबंधित देयकांवर १ टक्के शुल्क लागू असेल. बाह्य पेमेंट प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रक्रिया खर्चाची भरपाई करण्याच्या हेतूनं हा बदल करण्यात आला आहे.

युटिलिटी आणि फ्युअल ट्रान्झॅक्शन चार्जेस

युटिलिटी पेमेंटसाठी व्यवहाराची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास नव्यानं १ टक्के चार्ज आकारला जाईल. १० हजार रुपयांपेक्षा जास्त इंधन व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारलं जाईल.

काही शुल्कांवर नव्या धोरणाचा परिणाम झालेला नाही. बँक शाखांमध्ये रोख देयकाचे शुल्क अजूनही प्रति व्यवहार १०० रुपये असेल, तर अ‍ॅमेझॉन पे कार्डवर विशिष्ट सवलतीसह व्यवहाराच्या रकमेवर इंधन अधिभार आणि भाडे भरण्याचे शुल्क १ टक्के राहील. याव्यतिरिक्त, शिल्लक रक्कम पूर्ण भरल्याशिवाय सर्व थकित शिल्लक आणि रोख अ‍ॅडव्हान्सवर व्याज शुल्क लागू राहील.

Whats_app_banner