IFCI Share Price : शेअर असावा तर असा! अवघ्या दहा महिन्यांत पैसे झाले सातपट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IFCI Share Price : शेअर असावा तर असा! अवघ्या दहा महिन्यांत पैसे झाले सातपट

IFCI Share Price : शेअर असावा तर असा! अवघ्या दहा महिन्यांत पैसे झाले सातपट

Jan 31, 2024 02:50 PM IST

IFCI Share Price : आयएफसीआय कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना संयमाचं गोड फळ दिलं आहे.

IFCI Share gave 7 times returns in just 10 months
IFCI Share gave 7 times returns in just 10 months

IFCI Share Price : इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात, आयएफसीआयच्या शेअरनं गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा मिळवून दिला आहे. अवघ्या १० महिन्यांत या कंपनीनं सात पट परतावा दिला आहे. १० महिन्यांपूर्वी ९ रुपयांवर असलेला हा शेअर आज ६१ रुपयांवर पोहोचला आहे.

आयएफसीआयच्या शेअरमधील तेजी भंडावून सोडणारी आहे. मागच्या पाच दिवसांत या शेअरनं सुमारे ४० टक्के परतावा दिला आहे. या पाच दिवसात शेअरला तीनवेळा अप्पर सर्किट लागलं. आज हा शेअर ५९.९५ रुपयांवर उघडला आणि ५६.५० रुपयांपर्यंत खाली आल्यानंतर तो ६१.०५ रुपयांच्या अपर सर्किटवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६३.८५ रुपये आणि नीचांकी ९ रुपये आहे. 

Bank holidays in February : २९ दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ दिवस राहणार बँका बंद; वाचा यादी

अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे पाच पटीने वाढवले ​​आहेत. वर्षभरापूर्वी IFCI शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवणाऱ्यांचे पैसे आज ४.८४ लाख रुपये झाले आहेत. या कालावधीत शेअरनं ३८४.५२ टक्के परतावा दिला आहे.

धक्का देणारा शेअर

आयएफसीआय हा किंमतीच्या बाबतीत धक्का देणारा शेअर राहिला आहे. गेल्या तीन दिवसांत १५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या सात दिवसांत त्यात ५२ टक्के आणि गेल्या १५ दिवसांत शेअरमध्ये १०४ टक्के वाढ झाली आहे. एनएसईच्या (NSE) ऑर्डर बुकमध्ये आज तब्बल ८,६३,११७१ शेअर्स खरेदीसाठी रांगेत आहेत, पण कोणीही विकायला तयार नाही. कंपनीचं मार्केट कॅप रु. १५.१९ हजार कोटी आहे.

थर्मामीटरचं काम करणार हा स्मार्टफोन, कपाळ स्कॅन करून सांगणार अचूक तापमान

संयमी गुंतवणूकदार झाले मालमाल

आयएफसीआयच्या समभागांनी गेल्या एका महिन्यात ११०.५२ टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात या शेअरनं गुंतवणूकदारांचे १ लाख रुपये ४.८१ लाख रुपयांवर नेले आहेत. या कालावधीत शेअरनं ३८४.५२ टक्के परतावा दिला आहे. या छोट्या स्टॉकनं गेल्या तीन वर्षांत सुमारे ५९३ टक्के आणि गेल्या पाच वर्षांत ३४८ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे.

Union Budget 2024 : कसा तयार होतो केंद्रीय अर्थसंकल्प?; जाणून घेऊया सोप्या शब्दांत

परदेशी गुंतवणूकदारांची पसंती

आयएफसीआयच्या शेअरवर विदेशी गुंतवणूकदार फिदा आहेत. डिसेंबर तिमाहीत संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदारांनी कंपनीतीला त्यांची भागीदारी १.८७ वरून २.०८ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांचं शेअर होल्डिंग १.९७ वरून १.९८ टक्क्यांवर नेलं आहे. इतरांकडे २५.६२ टक्के, तर प्रवर्तकांकडे ७०.३२ टक्के शेअर आहेत.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner