IDFC Q3 Results : खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेनं डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालानंतर शुक्रवारी बँकेच्या शेअरच्या किमतीत जोरदार तेजी पाहायला मिळाली. सोमवारी हा शेअर नवी उंची गाठू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर शुक्रवारी ६५.८० रुपयांवर पोहोचला. गुरुवारच्या ६४.६८ रुपये प्रति शेअरच्या बंद भावापेक्षा हा दर १.२५ टक्क्यांनी अधिक होता. शुक्रवारी हा शेअर ६५.१८ रुपयांवर बंद झाला. आदल्या दिवसाच्या तुलनेत हा शेअर ०.७४ टक्क्यांनी वधारला होता. जानेवारी २०२४ मध्ये हा शेअर ८९.६० रुपयांवर होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
शेअर बाजारातील जाणकारांच्या मते, आयडीएफसी फर्स्ट बँकेनं ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत आपल्या व्यवसायात मजबूत आर्थिक वाढीची नोंद केली आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेनं सुमारे २५ टक्के वार्षिक वृद्धी नोंदविली. त्याचवेळी कर्जे आणि अॅडव्हान्समध्ये २१.९ टक्क्यांनी वाढ झाली. आता सोमवारी बँकेच्या शेअर्सवर लक्ष असणार आहे.
बँकेच्या डिसेंबर तिमाहीच्या अपडेटबाबत बोलताना लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन म्हणाले, 'बँकेने कर्ज आणि अॅडव्हान्स, ग्राहक ठेवी आणि CASA (चालू खाते-बचत खाते) शिल्लक रकमेत लक्षणीय वाढ नोंदविली आहे. शेअरच्या दृष्टीनं ही अनुकूल परिस्थिती आहे.
हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा यांनी बँकेच्या शेअर आऊटलूकबद्दल बोलताना सांगितले की, तांत्रिक चार्टवर शेअर्स सकारात्मक दिसत आहेत. ६२ रुपयांवर या शेअरला सपोर्ट दिसत असून लवकरच तो ७२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरची किंमत लवकरच ७५ आणि ७८ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं बँकेच्या भागधारकांना वर नमूद केलेल्या उद्दिष्टांसाठी ६२ रुपये स्टॉपलॉस कायम ठेवून शेअर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महेश एम. ओझा यांनी नवीन गुंतवणूकदारांना ७२ आणि ७८ रुपयांच्या नजीकच्या मुदतीच्या उद्दिष्टासाठी सोमवारी सध्याच्या बाजारभावानुसार खरेदी करण्याचा सल्ला दिला. स्टॉकसाठी ६२ रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा.
संबंधित बातम्या