
ICICI prudential : तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा तुमच्यासाठी कायमच महत्त्वपूर्ण असते. त्यामुळेच आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रु गोल्ड नावाने लाॅगटर्म सेव्हिंग प्राॅडक्ट दाखल केले आहे. यात तुम्हाला लाईफ लाँग कमाईसह तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षेसाठी लाईफ कव्हर कंम्पोनेंटही मिळतो. या उत्पादनात तीन पर्याय मिळतात. त्यात प्रामुख्याने इमिडिएट इन्कम, इमिडिएट इन्कम विथ बुस्टर आणि इमिडिएट इन्कम विथ डिफर्ड हे पर्याय दिले जातात.
३० दिवसातही पैसे काढण्याची मुभा
जर तुम्ही इमिडिएट इन्कम हा पर्याय निवडला तर पाॅलिसी इश्यू झाल्यानंतर अवघ्या ३० दिवसातही तुम्ही पैसे काढून घेऊ शकतात. जर तुम्ही इमिडिएट इन्कम विथ बूस्टर निवडला असेल तर तुम्हाला लाईफ लाँग इन्कमशिवाय पाॅलिसी वर्षाच्या प्रत्येक पाचव्या महिन्यात गॅरेंटिड इन्कम मिळते. ही इन्कम पाॅलिसी जारी करण्याची तारीख ३० दिवसांनंतर सुरु होते.
सेव्हिंग वाॅलेटमध्ये पैसे जमा करण्याची मुभा
इमिडिएट इन्कम विथ डिफर्ड पर्याय घेतल्यानंतर तुमच्याजवळ कधी इन्कमची सुरुवात करु शकतो याची मुभा असते. यात आपण दुसऱ्या पाॅलीसी वर्षाच्या सुरुवातीलाच अथवा १३ व्या पाॅ लीसी वर्षाच्या अखेरीस इन्कम मिळवण्याची सुरुवात करु शकतात. त्याशिवाय आयसीआयसीआय प्रु गोल्ड ग्राहकांना त्यांच्या इन्कमला रेग्युलेट पेमेंटशिवाय सेव्हिंग वाॅलेटमध्ये जमा करण्याची मुभा देते.
संबंधित बातम्या
