
Videocon loan fraud case : व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केलेला आहे. आज या प्रकरणात गेल्या पंधरा दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असल्येया चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची मुक्तता केली आहे. निर्णय देताना न्यायालयाने ही अटक कायद्याला अनुसरून नाही.
चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना एक एक लाखाच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
या प्रकरणात व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणू गोपाळ धूत यांना पण न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आले आहे.
चंदा कोचर यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले
आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे आणि प्रत्येकी एक लाखाच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीआयने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक केली होती.
व्हिडिओकाॅन कर्ज प्रकरणी अटक
केंद्रीय अन्वेषण ब्युरो ने २३ डिसेंबर रोजी व्हिडिओकॉन फसवणूक प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली. कोचर हे आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि सीईओ असताना व्हिडिओकॉनला मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. कोचर यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि पदाचा गैरवापर केल्याच्या आरोप त्यांच्यावर होता.
हे आहे संपूर्ण प्रकरण
५९ वर्षीय चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआसी बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला होता. व्हिडीओकॉन समुहाला अनुकूलता दाखवून कर्ज देण्याच्या नियमांना बगल दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
कंपनीला बँकेकडून ३२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. सीबीआयने 2012 मध्ये चंदा कोचर यांच्यावर व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जाच्या रकमेत गुन्हेगारी कट आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तथापि, नंतर ही कर्जरकम आयसीआयसीआय बँकेसाठी नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) बनले.
संबंधित बातम्या
