मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ICICI Bank : ही चूक कराल तर बँक खाते होईल रिकामे! ICICI बँकेने दिला 'हा' इशारा; वाचा

ICICI Bank : ही चूक कराल तर बँक खाते होईल रिकामे! ICICI बँकेने दिला 'हा' इशारा; वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 03, 2024 08:08 AM IST

ICICI Bank alert : ICICI बँकेने ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने ग्राहकांना बनावट लिंक्स आणि फाइल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. पेमेंट ॲप्सवर नोंदणी करताना या फायली आणि लिंक खातेदारांच्या मोबाइलवर पाठवून त्यांची खाती रिकामे केली जात आहे.

ही चूक कराल तर बँक खाते होईल रिकामे! ICICI बँकेने दिला 'हा' इशारा
ही चूक कराल तर बँक खाते होईल रिकामे! ICICI बँकेने दिला 'हा' इशारा

ICICI Bank alert : ICICI बँकेने खातेदारांना एक नोटिस जारी केली आहे. बँकेने वापरकर्त्यांना बनावट लिंक्स आणि फाइल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात सायबर गुन्हेगारांनी अनेकांना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी चतुराईने खातेदारांना व्हायरस असलेल्या लिंकवर क्लिक करण्यासाठी किंवा मालवेअर फाइल डाउनलोड करण्याचे आमिष दाखवून त्यांची खाती रिकामी केली आहेत.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव! कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील ७ ठार

सायबर चोरटे हे खातेदारांच्या पेमेंट ॲप्सवर नोंदणी करताना या फायली आणि लिंक खातेदारांच्या मोबाइलवर संदेश फॉरवर्डिंग प्रक्रियेणे पाठवतात. एवढेच नाही तर या युक्तीने हॅकर्स खातेदारांना मोबाइलवर मिळालेला ओटीपी आणि इतर माहिती स्वतःला संबंधित व्यक्तीला न कळू देता स्वत:ला फॉरवर्ड करू शकतात. यामुळे बँकेने खातेदारांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा लिंक्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक किंवा डाउनलोड करू नका असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

Mumbai Pune expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय ? पुढील दोन दिवस 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

आयसीआयसीआय बँकेने असेही म्हटले आहे की बँक कोणत्याही मोबाइल नंबरवर कॉल करण्यासाठी किंवा कोणतेही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवत नाही. यासोबतच बँकेने खातेदारांसोबत काही सुरक्षा टिप्सही शेअर केल्या आहेत, ज्याद्वारे अशा ऑनलाइन फसवणूक टाळता येऊ शकतात.

या पद्धतीचे अनुकरण करा

१. नवींन ऑपरेटिंग सिस्टम आणि विविध सुरक्षा प्रणाली मोबाइलमध्ये अपडेट करा.

२. नेहमी Google Play Store आणि Apple App Store सारख्या विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरून ॲप्स डाऊनलोड करा.

PCMC News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलले

३. विश्वासार्ह कंपनीचा अँटीव्हायरस किंवा सुरक्षा सॉफ्टवेअर देखील मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्या. तसेच ते वेळोवेळी अपडेट देखील करत रहा.

४. बँकेशी संबंधित कोणतेही कागद पत्र किंवा मेल मंजूर करण्यापूर्वी वाचून घेऊन तसेच खात्री करून घ्या.

५. ईमेल किंवा मेसेजमध्ये येणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

६. कोणत्याही अज्ञात व्यक्तिकडून कोणतीही लिंक अथवा मेसेज आल्यास तो डाउनलोड करणे किंवा वाचने टाळा.

७- ओटीपी, पासवर्ड, पिन किंवा कार्ड नंबर कधीही कोणाशीही शेअर करू नका.

८. अशा फसवणुकीची तत्काळ नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार करा.

WhatsApp channel