Hyundai Venue Price hike : ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा किंमत वाढीचा झटका दिला आहे. कंपनीने २०२३ वेन्यूला देशांतर्गत बाजारात ७.६८ लाख (एक्स शोरूम किंमत) रुपयांमध्ये दाखल केले होते. या बदलानंतर ह्युंदाई वेन्यूच्या बेस ई व्हेरियंट्सच्या किंमतींमध्मये ५३०० रुपयांची वाढ झाली आहे. तर इतर व्हेरियंट्सवर कोणताही प्रभाव पडणार नाही.
५ व्यक्तींची आसन क्षमता असलेल्या काॅम्पॅक्ट एसयूव्ही ६ विविध ट्रिम्प्समध्ये उपलब्ध आहे. मार्केटमध्ये ते ई, एस, एस प्लस, एस(ओ), एसएक्स आणि एसएक्स (ओ) च्या रुपात उपलब्ध आहेत. खरेदीदार वेन्यूला ६ सिंगल टोन कलर आॅप्शन अथवा ड्यूएल टोनपैकी कोणत्याही एका टोनमध्ये निवडू शकतात. सिंगल टोन पॅलेटमध्ये फायरी रेड, फॅटम ब्लॅक, डेनिम ब्लू, टायफून सिल्व्हर, टायटन ग्रे, पोलर व्हाईटमध्ये खरेदी करू शकतात.
ह्युंदाई वेन्यू तीन वेगवेगळ्या इंजिन पावरट्रेन आॅप्शनमध्ये उपलब्ध आहेत. यात १.२ लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. त्यानंतर १.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि शेवटी १.५ लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.
ह्युंदाईने नुकतेच वेन्यूचे नाईट व्हेरियंट दाखल केले होते. त्याची किंमत ९,९९,९९० रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते. या व्हेरियंटमध्ये इंजिनचे दोन पर्याय मिळतात.