Hyundai Creta Facelift: दक्षिण कोरियन कंपनी हुंदाईने जानेवारी २०२४ मध्ये हुंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) कार लाँच केली आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत याचे बुकिंग ५०,००० यूनिट पार झाले आहे. मात्र ज्या लोकांनी ही कार बुक केली आहे, त्यांना डिलिव्हरीसाठी अजून ६ महिने वाट पाहावी लागणार आहे. कंपनीकडून या एसयूव्ही कारचा वेटिंग पीरियड वाढवून ६ महिने केला आहे. भारतात क्रेटा हुंदाई कंपनीची लोकप्रिय व अधिक विक्री होणारी कार आहे.
Hyundai Creta Facelift एकूण सात व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ईएक्स, एस, एस (ओ), एसएक्स, एसएक्स टेक आणि एसएक्स (ओ) आदिचा समावेश आहे. एक्स-शोरूम या कारची किंमत ११ लाखापासून सुरू होते. ही ५ सीटर कार आहे. त्याचबरोबर हुंदाई क्रेटा फेसलिफ्ट सहा मोनोटोन आणि एक ड्यूल-टोन कलर ऑप्शनसह येते. त्यामध्ये रोबस्ट एमराल्ड पर्ल, फिएरी रेड, रेंजर खाकी, एबिस ब्लॅक, एटलस व्हाइट, टाइटन ग्रे आणि ब्लॅक रूफसह एटलस व्हाइट रंगात उपलब्ध आहे.
Hyundai Creta Facelift मध्ये तीन इंजिन ऑप्शन दिले आहेत. यामध्ये १.५ लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल दिले आहे, जे ६-स्पीड एमटी आणि सीव्हीटीसोबत ११५ पीएसच्या पॉवरवर १४४ एनएम टॉर्क जेनरेट करण्यात सक्षम आहे. त्याबरोबरच यामध्ये १.५-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे, जे ७-स्पीड डीसीटीसोबत १६० पीएसची पॉवर आणि २५३ एनएम टॉर्क जेनरेट करते. याचे तिसरे इंजिन १.५-लीटर डिझेल आहे, जे ६-स्पीड एमटी आणि ६-स्पीड एटीसोबत ११६ पीएसची पॉवर आणि २५० चे टॉर्क जेनरेट करते..
Hyundai Creta Facelift च्या १.५-लिटर पेट्रोल एमटीमध्ये १७.४ किलोमीटर प्रति लीटर सरासरी मायलेज मिळते. तसेच १.५-लिटर पेट्रोल सीवीटी मध्ये १७.७ किलोमीटर प्रति लिटर, १.५-लिटर टर्बो-पेट्रोल डीसीटीमध्ये १८.४ किलोमीटर प्रति लिटर, १.५-लिटर डिझेल एमटीमध्ये २१.८ किलोमीटर प्रति लिटर आणि १.५-लिटर डिझेज एटीमध्ये १९.१ किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळते.
Hyundai Creta Facelift कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारमध्ये कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसोबत ड्यूल इंटीग्रेटेड १०.२५-इंच डिस्प्ले (एक इंफोटेनमेंट सिस्टम आणि एक इंस्ट्रूमेंटेशनसाठी), ड्यूल-झोन एसी, ८-स्पीकर साउंड सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, ८ प्रकारे पॉवर एडजस्ट होणारी ड्रायव्हर सीट आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट सारखे फीचर्स दिले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये सहा एयरबॅग, ३६०-डिग्री कॅमरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (एडीएएस) सारखे सेफ्टी फीचर दिले आहेत. कार मार्केटमध्ये याची स्पर्धा एमजी एस्टर, स्कोडा कुशाक, फोक्सव्हॅगन टायगन, मारुति ग्रँड व्हिटारा, टोयोटा हायराइडर, होंडा एलिवेट, सिट्रोएन सी३ एयरक्रॉस आणि किया सेल्टोस या कारसोबत आहे.