Hyundai Creta EV : ४७३ किमी रेंज; ५८ मिनिटांत फुल्ल चार्ज, जाणून घ्या ह्युंदाई क्रेटा ईव्हीचे अ‍ॅडव्हान्स फिचर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Hyundai Creta EV : ४७३ किमी रेंज; ५८ मिनिटांत फुल्ल चार्ज, जाणून घ्या ह्युंदाई क्रेटा ईव्हीचे अ‍ॅडव्हान्स फिचर्स

Hyundai Creta EV : ४७३ किमी रेंज; ५८ मिनिटांत फुल्ल चार्ज, जाणून घ्या ह्युंदाई क्रेटा ईव्हीचे अ‍ॅडव्हान्स फिचर्स

Jan 02, 2025 06:28 PM IST

Hyundai Creta EV : ह्युंदाई क्रेटा ईव्हीवरून पडदा उठला असून कंपनीने लाँचिंगपूर्वीच तिचे फिचर्स रिवील केले आहेत. या ईव्हीची रेंज सिंगल चार्जमध्ये ४७३ किमी आहे. ही रेंज अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्यांनी भरलेली असेल. जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये.

ह्युंदाई क्रेटा ईव्ही
ह्युंदाई क्रेटा ईव्ही

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai ने अखेर आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV Hyundai Creta EV चे अनावरण केले आहे. ह्युंदाईने क्रेटा इलेक्ट्रिक एसयूव्हीचे अधिकृत सादरीकरण केले आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही १७ जानेवारी रोजी इंडिया मोबिलिटी एक्सपोमध्ये लाँच केली जाणार आहे. कंपनीने नुकताच या नव्या ईव्हीचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये अनेक डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. टीझरमध्ये एआरएआय-प्रमाणित रेंज ४७३ किमी असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ही कार यंदाच्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये ही कार लाँच करेल अशी बातमी आहे.  चला तर मग जाणून घेऊया या नव्या इलेक्ट्रिक कारशी संबंधित काही खास गोष्टी.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पर्यायांसह येते:

1- ४२ केडब्ल्यूएच बॅटरी: ३९० किमी.

2- ५१.४ केडब्ल्यूएच बॅटरी:४७३ किमी. 

ह्युंदाईचा दावा आहे की लाँग रेंज व्हेरिएंट केवळ ७.८ सेकंदात ०-१०० किमी / तास वेगाने धावू शकते. तसेच ही एसयूव्ही तीन ड्राइव्ह मोड (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट) सोबत येते. सिंगल पेडल ड्रायव्हिंगसाठी यात आय-पेडल तंत्रज्ञान आहे.

चार्जिंग टाइम पीरियड -

चार्जिंगचा विचार केल्यास डीसी फास्ट चार्जरने १०% ते ८०% चार्ज करण्यासाठी फक्त ५८ मिनिटे लागतात. तर ११  किलोवॅट एसी वॉल बॉक्स चार्जरने १०% ते १००% चार्ज करण्यासाठी ४ तास लागतात.

 

हुंडई क्रेटा ईवी के हाइलाइट्स
हुंडई क्रेटा ईवी के हाइलाइट्स (Hyundai Creta Electric)

डिझाइन आणि वैशिष्ट्ये

डिझाइनच्या बाबतीत, क्रेटा इलेक्ट्रिकची बॉडी बहुतेक आयसीई (इंटरनल कबूशन इंजिन) क्रेटा सारखीच आहे. याचे फ्रंट आणि रिअर बंपर नवीन पिक्सल डिटेलिंगसह अपडेट करण्यात आले आहेत. 

फ्रंट ग्रिल बंद करण्यात आली असून त्याला स्पष्ट इलेक्ट्रिक लूक देण्यात आला आहे. या ईव्हीमध्ये नवीन एरो-ऑप्टिमाइझ्ड अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. चार्जिंग पोर्ट SUV चे नोज़ (समोरच्या बाजुला ) लावण्यात आले आहेत.

व्हीकल-टू-लोड सारखे अ‍ॅडव्हान्स फिचर्स -

इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर यात दोन १०.२५ इंच स्क्रीन, नवीन फ्लोटिंग सेंट्रल कंसोल डिझाइन, ३६० डिग्री कॅमेरा, एडीएएस (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम), पॅनोरॅमिक सनरूफ आणि ह्युंदाईचे अनेक डिजिटल फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या ईव्हीमध्ये व्हेइकल-टू-लोड फीचर्स (व्ही २ व्ही) देखील देण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने एक इलेक्ट्रिक वाहन दुसऱ्या इलेक्ट्रिक वाहनातून चार्ज केले जाऊ शकते.

व्हेंरिएंट्स आणि कलर्स -

ह्युंदाई क्रेटा ईव्ही ४ व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स व्हेरिएंट असतील. ही एसयूव्ही ८ मोनोटोन आणि २ ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये येईल, ज्यात ३ मॅट फिनिश कलर्स चा समावेश आहे. एकूण १० कलर ऑप्शन ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत.

क्रेटा इलेक्ट्रिकचा या गाड्यांशी स्पर्धा -

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ची थेट टक्कर मारुती ई-विटारा, महिंद्रा बीई ६ आणि टाटा कर्व्ह ईव्हीशी होईल. तथापि, या सर्व एसयूव्ही बॉर्न-इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत, तर क्रेटा इलेक्ट्रिक आयसीई प्लॅटफॉर्मवरून एडॉप्ट केली गेली आहे.

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक केवळ लाँग रेंज आणि दमदार परफॉर्मन्सच देत नाही, तर त्याची वैशिष्ट्ये आणि डिझाइन देखील याला प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही बनवते. लाँच झाल्यानंतर भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात ही कार प्रबळ दावेदार ठरू शकते. याची किंमत 17 जानेवारीला जाहीर केली जाईल. अशा तऱ्हेने ह्युंदाई या सेगमेंटमध्ये आपली पकड कशी मजबूत करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Whats_app_banner