Hyundai i20 Car Offers: येत्या काही दिवसात नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध कार निर्माता कंपनी ह्युंदाई फेब्रुवारी २०२५ मध्ये आपल्या लोकप्रिय हॅचबॅक आय२० कारच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट देत आहे. त्यामुळे आय२० कार खरेदी करण्याचा ठरवले असेल, अशा ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. ह्युंदाईच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना हजारो रुपये वाचवता येणार आहेत.
ह्युंदाई आय२० च्या इंटिरियरमध्ये ग्राहकांना १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जर सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, कारमध्ये सुरक्षेसाठी ६-एअरबॅग, रियर पार्किंग कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम देखील देण्यात आले आहे.
ह्युंदाई आय२० मध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे ८३ बीएचपीपॉवर आणि ११५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि सीबीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे.
ह्युंदाई आय२० ही ५ सीटर हॅचबॅक कार असून सध्या ती ६ व्हेरियंटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. भारतीय बाजारात ह्युंदाई आय२० ची किंमत ७.०४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ते ११.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
ह्युंदाईला आशा आहे की, क्रेटा ईव्ही कंपनीच्या ईव्ही रणनीती आणि सेगमेंटमधील वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. भारतातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा ईव्ही अवतार कोरियन ऑटो जायंटने स्थानिक पातळीवर तयार केलेली पहिली इलेक्ट्रिक कार आहे. भारतातील लोकप्रिय मॉडेलच्या एकूण विक्रीत क्रेटा ईव्ही कमीतकमी १० टक्के योगदान देईल, अशी आशा कार निर्मात्याने व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली क्रेटा एसयूव्ही सध्या दरमहा सरासरी १०,००० हून अधिक युनिट्सची विक्री करते. एसयूव्हीचे ईव्ही व्हर्जन दरमहा किमान एक हजार युनिट्सची कमाई करेल, अशीही कंपनीला आशा आहे. क्रेटा एसयूव्हीने जवळपास दशकभरापूर्वी पदार्पण केल्यापासून आतापर्यंत संपूर्ण भारतात ११ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.
संबंधित बातम्या