Credit Card : बँका क्रेडिट कार्ड ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट देतात. त्याचा उद्देश ग्राहकांना क्रेडिट कार्ड वापरण्यास प्रोत्साहित करणे हा असतो. हे रिवॉर्ड पॉइंट काय आहे आणि त्याचा वापर कसा करावा याबाद्दल सविस्तर येथे जाणून घ्या.
क्रेडिट कार्डवरून प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट मिळतात. उदाहरणार्थ, तुम्ही बँकेच्या क्रेडिट कार्डने पेट्रोल पंपावर १००० रुपयांचे इंधन भरु शकतात. जर बँकानी पेट्रोल डिझेलच्या प्रती १०० रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला ४ रिवाॅर्ड पाॅईंट्स दिले, तर या खरेदीत तुम्ही क्रेडिट कार्डावर ४० रिवाॅर्ड पाॅईंट्स कमावू शकतात.
क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी प्रत्येक बँक वेगवेगळ्या सुविधा देते. एकदा तुम्ही क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट जमा केले की, तुम्ही बँकेने दिलेल्या सुविधेनुसार ते रिडीम करू शकतात.
कॅटलॉग- बहुतेक बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात भेटवस्तूंचे 'कॅटलॉग' देतात. यातून तुम्ही भेटवस्तू निवडू शकतात. त्यात क्रॉकरी, खाण्यायोग्य वस्तू, गिफ्ट व्हाउचर आणि कपडे इत्यादी असू शकतात.
व्हाउचर- अनेक बँका किंवा क्रेडिट कार्ड कंपन्या रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी व्हाउचर देतात. हे व्हाउचर कोणत्याही दुकानात किंवा ऑनलाइन खरेदीवर वापरले जाऊ शकते. व्हाउचरची किमान रक्कम अंदाजे १०० रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत असू शकते.
रोख- अनेक बँका क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांना 'मनीबॅक' कार्डच्या स्वरूपात रोख परत देतात. ही रक्कम तुमच्या क्रेडिट कार्डच्या शिल्लकमध्ये जोडली जाते. यासह, तुम्ही क्रेडिट कार्डशी संबंधित कोणत्याही कामासाठी किंवा बिल पेमेंटसाठी वापरू शकतात.
माइल्स - अनेक बँका ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने माइल्स कार्ड ऑफर करतात. विमान प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक चांगली सुविधा आहे. यामध्ये, तुम्हाला प्रत्येक फ्लाइट तिकीट खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या रूपात माइल्स मिळतात. हे क्रेडिट कार्ड माइल्स प्रत्यक्षात फ्लाइट तिकिटांसाठी रिडीम केले जाऊ शकतात.
देणगी - बँका आता त्यांच्या ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याऐवजी देणगी देण्याची सुविधा देतात. तुम्हाला कोणत्याही बिगर-सरकारी संस्था (एनजीओ), शैक्षणिक संस्था किंवा धर्मादाय संस्थेला देणगी द्यायची असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून त्या संस्थेला देणगी देऊ शकतात.
कॅश बॅक- बर्याच बँका आता ग्राहकांना क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी विशिष्ट खरेदीवर कॅशबॅक देतात. यामध्ये तुम्हाला शॉपिंगवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळत नाहीत, त्याऐवजी तुम्हाला कॅशबॅक मिळतो.
इतर पर्याय - क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना इतर सुविधा देखील देतात. यामध्ये इंधन, विशेष सेवा, मनोरंजन वैशिष्ट्ये, प्रशिक्षण, वर्ग इ. याशिवाय, या बँकांचे ग्राहक हॉलिडे पॅकेज, हॉटेल बुकिंग इत्यादींसाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स देखील वापरू शकतात. जर बँकेने डिपार्टमेंटल स्टोअरशी करार केला असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करता येतात आणि त्याद्वारे खरेदी करता येते.
संबंधित बातम्या