अनेक जणांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये एका पेक्षा जास्त अकौंट काढलेले असते. उदाहरणार्थ- एखाद्याचे एका बँकेत सॅलरी अकाउंट, पोस्टात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे (PPF) अकाउंट आणि तिसऱ्या बँकेत मुदत ठेव अकाउंट असू शकते. एखादा माणूस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला अशा वेगवेगळ्या बँकांमधील अनेक अकौंटचे व्यवस्थापन करणे कठीण होऊ शकते. अशावेळी ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी सर्व अकौंट एकाच बँकेत ठेवण्याचा पर्याय चांगला ठरू शकतो. उदाहरणार्थ, ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे त्याच बँक अकाउंटला तुम्ही पीपीएफ खाते जोडू शकता. शिवाय पीपीएफ अकौंट हे बँक अकौंटशी जोडल्यामुळे तुम्ही पीपीएफ खात्यात दर महिन्याला बँक अकौंटमधून सहज ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकतात. पोस्टात पीपीएफ अकाउंट असल्यास तेथे ऑनलाइन सुविधा नसते. शिवाय पीपीएफ अकौंटचे मासिक विवरण जाणून घेणे, केवायसी करणे या सर्व गोष्टी बसल्या जागी ऑनलाइन करू शकता.
आता तुमचे पोस्टातील पीपीएफ अकाउंट बँक अकाउंटला कसे जोडाल याविषयी संपूर्ण माहिती
PPF म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकारद्वारे पुरस्कृत योजना आहे. यात फायदेशीर व्याज दर आणि गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळतो. पीपीएफ ईईई टॅक्ससाठी पात्र आहे. आयटी कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत पीपीएफ ठेवी प्रति आर्थिक वर्ष दीड लाख रुपयांपर्यंत करवजावट पात्र आहेत. या योजनेत तुमच्या गुंतवणुकीला उच्च दर्जाची सुरक्षितता प्राप्त होते.
PPF खाते उघडल्यावर १५ वर्षांचा ‘लॉक-इन’ कालावधी असतो. म्हणजे यादरम्यान तुम्हाला पैसे काढता येत नाही. १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा दर पाच वर्षांच्या कालखंडाने अकाउंटचा कालावधी पुढे वाढवता येतो. यात मुदतपूर्तीपूर्वी आंशिक स्वरुपात खात्यात जमा पैसे काढण्याचीही परवानगी असते. तसेच काही अटी-शर्तींच्या आधारे खातेधारकाला कर्जाची सुविधा देखील मिळते. पीपीएफ अकाउंट ओपन करण्याचे बरेच फायदे असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही बचत योजना चांगली लोकप्रिय आहे. सध्या पीपीएफच्या गुंतवणुकीवर वार्षिक ७.१ टक्के व्याजदर मिळतो. पीपीएफचा व्याजदर दर तिमाही जाहीर केला जातो.
1. तुमचे पीपीएफ खाते ज्या पोस्ट ऑफिसमध्ये असेल तेथे सर्वप्रथम भेट द्या. पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांना पीपीएफ अकाउंट ट्रान्स्फर फॉर्मविषयी विचारा
2. तुमच्या PPF खात्याचा आणि ज्या बँकेच्या अकाउंटशी तुम्ही ते जोडणार आहे त्या बँक शाखेचे नाव, पत्ता असा संपूर्ण तपशील भरा.
3. बँकेत जाऊन PPF अकाउंट ट्रान्स्फर फॉर्म सबमिट करा.
4. बँकेत विनंती अर्ज सादर केल्यानंतर तुमच्याजवळ नोंद ठेवण्यासाठी पोचपावती घ्यायला विसरू नका
5. पोस्ट ऑफिस तुमचे तपशील सत्यापित करेल आणि हस्तांतरण प्रक्रिया सुरू करेल
6. PPF खात्याची प्रमाणित प्रत, खाते उघडण्याचा अर्ज, पासबुक, नामनिर्देशन फॉर्म, खातेदाराची नमुना स्वाक्षरी आणि थकित रकमेसाठी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट पोस्टाद्वारे नवीन बँकेला पाठण्यात येईल.
7. एकदा सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर नवीन बँक खातेधारकाला सूचित करेल
8. KYC मध्ये बदल झाल्यास, नवीन बँक खातेदाराला नवीन खाते उघडण्याचा फॉर्म भरण्यास सांगू शकते
9. नवीन बँक पीपीएफ खाते उघडेल आणि त्यात शिल्लक रक्कम हस्तांतरित करेल
10. संपूर्ण प्रक्रियेला एक महिना लागू शकतो.
11. तुमचे पीपीएफ खाते बँक अकौंटशी जोडल्यानंतर तुम्ही पीपीएफ खात्यात ऑनलाइन ऑनलाइन भरू शकता.
संबंधित बातम्या