WhatsApp Two Step Verification: अलीकडच्या काळात ऑनलाईन व्यवहारात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, यासह सायबर गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकांना लुटण्यासाठी सायबर गुन्हेगार विविध मार्ग अवलंबत आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना सायबर गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी नवीन प्रायव्हसी फीचर्स लॉन्च केले आहे.
लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जगभरातील सायबर गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनले आहे. व्हॉट्सअॅप काही ग्रुप बनवून शेअर बाजाराच्या संबंधित पैसा कमवण्यासाठी खोट्या टीप्स देऊन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले जात आहे. सायबर गुन्हेगारामुळे लोक आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गमावत आहेत. अशा सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप एक पाऊल पुढे आले आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचे फीचर्स आहे, ज्यामुळे वापकर्त्यांना अतिरिक्त सुरक्षा मिळते. एकदा ही सेटिंग्ज चालू केल्यानंतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना पिन तयार करण्यास सांगितले जाते. यासाठी बायोमेट्रिक्स देखील आवश्यक असेल. टू स्टेप वेरिफिकेशन चालू करण्याची पद्धत खूप सोपी आहे.
सायबर गुन्हेगार लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेकदा व्हॉट्सअपवरून कॉल करतात. परंतु, अशी एक सेटिंग्ज आहे, जी चालू केल्यानंतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना कोणीही अनोळखी नंबरवरून कॉल करू शकणार नाही. ही सेटिग्ज चालू करण्यासाठी वापरकर्त्यांना प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर कॉल पर्यायावर क्लिक केल्यानंतर सायलेंन्स अननोन कॉलर्सवर क्लिक करायचे आहे. यानंतर कोणताही व्यक्ती व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल करू शकणार नाही.
व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच लाईक रिअॅक्शन फीचर येणार आहे. अपडेट पाहताना स्क्रीनच्या खालच्या डाव्या बाजूला हार्ट इमोजी दाबून दुसऱ्यांचे स्टेटस लाइक करू शकतात. ध्या सार्वजनिक बीटा वापरकर्त्यांकडून या फीचरची चाचणी केली जात आहे. सध्या हे व्हॉट्सअॅप बीटा वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नवीनतम आवृत्ती २.२४.१७.२१ सह उपलब्ध आहे आणि येत्या आठवड्यात नियमित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.