मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Home loan EMI : वाढत्या गृहकर्जाच्या EMI ने आहात त्रस्त ? ३० लाखांच्या कर्जावर अशी करा ४ लाखांची बचत

Home loan EMI : वाढत्या गृहकर्जाच्या EMI ने आहात त्रस्त ? ३० लाखांच्या कर्जावर अशी करा ४ लाखांची बचत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 01, 2023 01:38 PM IST

Home loan EMI : नव्या आर्थिक वर्षातील रिझर्व्ह बँकेचे पहिले तिमाही पतधोरण सोमवारी ३ एप्रिलला जाहीर होत आहे. व्याजदरात वाढ झाली तर कर्जाचे हप्ते वाढतील. पण गृहकर्जाचे हप्ते कमी करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण त्याची संपूर्ण आकडेमोड केली पाहिजे.

home loan HT
home loan HT

Home loan EMI : आरबीआयने गेल्या वर्षी मे पासून रेपो दरात २.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनीही त्यांच्या कर्जदरात लक्षणीय वाढ केली आहे. एकेकाळी ६.९० टक्के दराने कर्ज घेतलेल्या कर्जाचे ग्राहक सध्या ९.४ टक्के दराने परतफेड करत आहेत. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महागाई, वाढलेले गृहकर्जाचे ईएमआय यामुळे कर्जदारांच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. ईएमआय वाढल्यामुळे घराचे बजेटही बिघडले आहे. त्यामुळे ईएमआय कमी करण्यासाठी तुम्हाला काही ठोकताळे बांधले पाहिजेत.

प्रीपेमेंट पर्याय

गृहकर्ज EMI कमी करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. यामध्ये पार्ट पेमेंट किंवा प्रीपेमेंट हा महत्त्वाचा पर्याय असू शकतो. परंतु महागाई वाढल्याने अनेक लोकांकडे डिस्पोजेबल उत्पन्नही नाही, अशा परिस्थितीत बचत करून भाग पेमेंट किंवा प्रीपेमेंट करणे कठीण आहे.

तुमच्या बँकांशी बोला

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँका आणि वित्तीय संस्था ८.५ टक्के इतक्या कमी दराने गृहकर्ज देत आहेत. त्यामुळे तुम्ही बँकांना विनंती करु शकतात की, तुम्हाला शिल्लक हस्तांतरित करायची आहे. त्याशिवाय फोरक्लोजर लेटरसाठी विनंती करता येईल. यानंतर, कर्ज देणाऱ्या बँका सहसा कर्जाच्या व्याजदरात कपात करतात. व्याजदराबाबत तुम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकता. यानंतर तुमच्या होम लोनचा ईएमआय खाली येऊ शकतो. काही वेळा या प्रक्रियेसाठी बँका तुमच्याकडून नाममात्र शुल्क आकारतात.

बॅलन्स ट्रान्सफर

जर बँका व्याजदर कमी करत नसतील, तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता. या पर्यायामध्ये तुम्हाला काही पेपरवर्क करावे लागतील. पण तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. सध्या अनेक बँका प्रक्रिया शुल्क, कायदेशीर शुल्क आणि इतर शुल्कांवर माफी देखील देत आहेत. बॅलन्स ट्रान्सफरद्वारे, तुम्ही तुमचा मासिक ईएमआय कमी करू शकतात. पण त्याचबरोबर संपूर्ण कर्जावरील लाखो रुपयांची बचत देखील करता येते.

समजा राहुल नावाच्या व्यक्तीने २५ वर्षांसाठी बँकेकडून ३५ लाखांचे कर्ज घेतले होते. आता पाच वर्षे उलटून गेली आहेत आणि राहुलच्या कर्ज खात्यात अजूनही ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याच वेळी, कर्जाचा एकूण कालावधी २० वर्षे आहे. आता आपण असे गृहीत धरू की ज्या बँकेकडून त्याने कर्ज घेतले आहे ती त्याच्याकडून ९.४% व्याज आकारत आहे. अशा परिस्थितीत, त्याला दरमहा २७,७६८ रुपये ईएमआय भरावे लागेल. अशा प्रकारे, त्याला संपूर्ण कर्जावर (मुद्दल + व्याज) एकूण ६६,६४,३९८ रुपये खर्च करावे लागतील.

आता असे गृहीत धरू की राहुलने शिल्लक हस्तांतरित केली आहे आणि नवीन बँक त्याला ८.५% व्याजदराने कर्ज देत आहे, तर त्याला दरमहा २६,०३५ रुपये ईएमआय भरावे लागेल. अशाप्रकारे त्याचा ईएमआय दरमहा १७०० रुपयांपेक्षा जास्त वाचवेल. त्याच वेळी, मुद्दल आणि व्याजासह एकूण ६२,४८,३२७ रुपये कर्जावर खर्च केले जातील. अशाप्रकारे २० वर्षात राहुलचे ४,१६,०७१ रुपये वाचतील. जरी आपण असे गृहीत धरले की शिल्लक हस्तांतरणामध्ये सुमारे १०-१५ हजार रुपये खर्च झाले, तर कर्जदाराला देखील चार लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा होईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग