मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gadgets safety tips : जीवघेण्या उष्णतेमुळं मोबाइल, लॅपटॉपलाही लागू शकते आग, सुरक्षित राहायचं असेल तर घ्या 'ही' काळजी

gadgets safety tips : जीवघेण्या उष्णतेमुळं मोबाइल, लॅपटॉपलाही लागू शकते आग, सुरक्षित राहायचं असेल तर घ्या 'ही' काळजी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 01, 2024 04:55 PM IST

gadgets safety tips : अति उष्ण वातावरणात मोबाइल, लॅपटॉप, एसी सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना आगी लागण्याच्या घटना घडतात. ते टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? वाचा!

जीवघेण्या उष्णतेमुळं मोबाइल, लॅपटॉपलाही लागू शकते आग, सुरक्षित राहायचं असेल तर घ्या 'ही' काळजी
जीवघेण्या उष्णतेमुळं मोबाइल, लॅपटॉपलाही लागू शकते आग, सुरक्षित राहायचं असेल तर घ्या 'ही' काळजी

gadgets safety tips : प्रचंड उष्णतेमुळं एसीला आग लागल्याच्या आणि कॉम्प्रेसर फुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतीच नोएडातील एका सोसायटीत एसीला आग लागून ती संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इंदूरमध्येही असाच प्रकार घडला. अति उष्ण वातावरणाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जातं. यंदा तापमानानं उच्चांक गाठला असून उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये तापमान ५० अंशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं माणसांनाच नव्हे तर, मोबाइल, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही धोका निर्माण झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अति उष्णतेमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही जास्त गरम होऊ शकतात आणि काही वेळा आग देखील लागू शकते. ही उपकरणं इतकी गरम का होतात आणि त्यांना आग कशामुळं लागते हा प्रश्न निर्माण होतो. त्या कारणांचा शोध घेतानाच उपकरणं सुरक्षित कशी ठेवता येतील याबाबतही आपण जाणून घेऊया.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जास्त का गरम होतात?

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि एसी यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काम सुरू असताना उष्णता निर्माण करतात. जेव्हा सभोवतालचं तापमान जास्त असतं, तेव्हा पंखे आणि हीट सिंक यांसारखी या उपकरणांमधील कूलिंग यंत्रणा उष्णता प्रभावीपणे कमी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळं ते खूप गरम होतात. या प्रक्रियेत आतले काही पार्ट्स खराब होऊ शकतात आणि आग देखील लागू शकते.

या कारणामुळंच विमान प्रवास करताना तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पॉवर बँक इतर सामानांसोबत ठेवण्यास मनाई केली जाते. ती तुम्हाला तुमच्या केबिन बॅगेजमध्ये ठेवण्यास सांगितलं जातं. सामानात ठेवल्यास, दाब किंवा तापमानातील बदलांमुळं उपकरणाला आग लागू शकते. अधिक उष्ण वातावरणात गॅझेटमधील बॅटरी आणि इतर पार्ट्स गरम होऊन आग लागू शकते.

त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप दुपारच्या वेळी घरामध्ये वापरत असाल तर तुम्हाला ते वीज नसतानाही गरम होत असल्याचं दिसून येईल. त्यांच्या आत बसवलेल्या बॅटरीमुळे असं घडतं.

उपकरणं जास्त गरम होण्याची काही कारणं

पुरेशी खुली हवा नसणं - लॅपटॉप आणि टीव्ही सारख्या उपकरणांमध्ये उष्णता बाहेर काढण्यासाठी छिद्रे असतात. या छिद्रांना कोणत्याही प्रकारे अडथळा आणणं किंवा अडचणीच्या जागेत ही उपकरणं ठेवणं यामुळं मोकळी हवा अडली जाऊ शकते.

सतत वापर - मध्ये विश्रांती न घेता बराच वेळ डिव्हाइस वापरल्यानं डिव्हाइसचं तापमान वाढतं. विशेषत: गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंगसारख्या कामांदरम्यान डिव्हाइस लवकर गरम होतं.

उष्ण वातावरण - बाहेरील अति तापमानामुळं उपकरण थंड राहणं कठीण होतं. जेव्हा डिव्हाइस थेट सूर्यप्रकाशात किंवा थेट सूर्यप्रकाश चालू असलेल्या कारमध्ये सोडलं जातं तेव्हा तापमान आणखी वाढतं.

धूळ - खराब पंखे, खराब थर्मल पेस्ट किंवा तुमच्या स्मार्टफोन, एसी, लॅपटॉप आणि इतर उपकरणांमध्ये धूळ जमा होण्यामुळं त्यांची कूलिंग सिस्टम योग्य पद्धतीनं काम करत नाही.

अति गरम झालेलं डिव्हाइस थंड कसं करावं?

> तुम्हाला वाटत असेल की डिव्हाइस जास्त गरम होत आहे, तर ते वापरणं थांबवा आणि त्याला विश्रांती द्या. डिव्हाइस बंद करा आणि पॉवर स्त्रोतापासून अनप्लग करा. त्यामुळं पुढील उष्णता निर्मिती थांबते आणि आतील पार्ट्स थंड होतात.

> अनावश्यक ॲप्स बंद करा आणि स्क्रीनची चमक कमी करा. स्मार्टफोन फ्लाइट मोडवर ठेवल्यानं उष्णता निर्मिती कमी होऊ शकते.

> डिव्हाइसला सावलीच्या, थंड ठिकाणी, थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. मोबाइलचं कव्हर काढळ्यामुळं देखील त्याची उष्णता वेगानं नष्ट होण्यास मदत होऊ शकते. तुमचा लॅपटॉप उलटा ठेवू शकता जेणेकरून तळाशी असलेल्या पंख्याला हवा मिळेल.

> लॅपटॉपसाठी, अंगभूत पंखा असलेले कूलिंग पॅड अतिरिक्त वायुप्रवाह प्रदान करू शकतात. पंखे थंड ठेवण्यासाठी टीव्ही किंवा गेमिंग कन्सोलसारख्या मोठ्या उपकरणांभोवती ठेवता येतात.

आग लागली तर तातडीचे उपाय काय कराल?

> शक्य असल्यास डिव्हाइस ताबडतोब अनप्लग करा. मोठ्या उपकरणांसाठी मुख्य वीज पुरवठा बंद करा.

> आग लहान आणि आटोक्यात आणण्याजोगी असेल, तर विजेच्या आगीसाठी बनवलेल्या अग्निशामक यंत्राचा वापर करा. पाणी वापरू नका, कारण त्यामुळं आणखी नुकसान होऊ शकतं.

> आग पसरत असल्यास किंवा तुम्ही ती आटोक्यात आणू शकत नसल्यास कामाचं ठिकाण रिकामं करा आणि तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल करा.

> डिव्हाइसला आग लागल्यानंतर पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करू नका. कारण आगीमुळं त्याचं नुकसान झालेलं असल्यास धोका वाढू शकतो.

WhatsApp channel

विभाग