Photo Video Hider: फोनमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ लपवायचे कसे? खूपच सोपी आहे 'ही' ट्रिक
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Photo Video Hider: फोनमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ लपवायचे कसे? खूपच सोपी आहे 'ही' ट्रिक

Photo Video Hider: फोनमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ लपवायचे कसे? खूपच सोपी आहे 'ही' ट्रिक

Jul 02, 2024 01:41 PM IST

How to Hide Private Photos and Videos: फोनमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडिओ कोणाला दिसू नये, यासाठी काय करायचे? हे जाणून घेऊयात.

photo
photo

Private Photos and Videos Hide Tricks: अनेकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये फोटो सेव्ह करतात. पण असे काही फोटो असतात, जे कोणालाही दिसू नये, यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, कधी फोन चुकून एखाद्याच्या हातात गेला तर अनेकांचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ पाहिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अँड्रॉइड स्मार्टफोनमधील फोटो आणि व्हिडिओ लपवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगत आहोत. या ट्रिकच्या माध्यमातून खासगी फोटो आणि व्हिडिओ इतरांच्या नजरेपासून लपवू शकतो.

लॉक फोल्डर
गूगल लॉक फोल्डरमध्ये फोटो आणि व्हिडिओ ठेवण्याची परवानगी देते. हे लॉक केलेले फोल्डर फोनच्या पिनने लॉक करता येते. लॉक फोल्डरमध्ये हलवलेले फोटो आणि व्हिडिओ देखील फोटो ग्रीड, मेमरी, सर्च किंवा अल्बममध्ये दिसणे थांबवतात. विशेष म्हणजे लॉक केलेल्या फोल्डरचे फोटो आणि व्हिडिओ ते अ‍ॅप्सही पाहू शकणार नाहीत, ज्यांना फोटो अ‍ॅप अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी आहे.

फोनमधील फोटो आणि व्हिडिओ लॉक करण्याची प्रक्रिया

१) सर्वप्रथम गुगल फोटोज अ‍ॅप ओपन करा.

२) लायब्ररीवर टॅप करा आणि लॉक ऑप्शनवर जा.

३) सेट अप लॉक फोल्डर निवडा.

४) डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी स्क्रीनवर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा.

५) फोन लॉक करण्यासाठी पिन सेट करण्याची आवश्यकता असेल. फोनचे लॉक फोल्डर आणि स्क्रीन लॉक सारखेच असेल. आपण फोन आणि फोल्डरसाठी स्वतंत्र पासवर्ड किंवा पिन सेट करू शकत नाही.

लॉक केलेल्या फोल्डर्सच्या ऑटोमॅटिक बॅकअपसाठी फॉलो करा या स्टेप्स

१) सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये गुगल फोटोज अ‍ॅप ओपन करा.

२) गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करा.

३) वर दिलेल्या प्रोफाईल फोटो किंवा नावावर टॅप करा.

४) फोटो सेटिंग्जवर टॅप करून बॅकअपवर जा आणि बॅकअप लॉक फोल्डर सिलेक्ट करा.

५) लॉक फोल्डर ओपन करा.

६) प्रॉम्प्ट मिळाल्यावर डिव्हाइसची लॉक स्क्रीन वापरा.

७) आवश्यकतेनुसार लॉक केलेले फोल्डर चालू किंवा बंद करा.

Whats_app_banner