YouTube Premium Membership: युट्यूब हे जगभरातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. परंतु, युट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना वापरकर्त्यांना अनेकवेळा नकोशा जाहिराती पाहाव्या लागतात. जाहिरातमुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी वापरकर्त्यांना युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावे लागते.मात्र, होळीपूर्वी युट्यूबने त्यांच्या निवडक ग्राहकांना खास गिफ्ट दिले आहे, ज्यांना फुकटात युट्यूब प्रीमिअम सब्सक्रिप्शन मिळू शकते.
भारतीय वापरकर्त्यांना युट्यूब सब्सक्रिप्शन घेण्यासाठी दरमहा १२९ रुपये खर्च करावे लागतात. परंतु, कंपनीने होळीपूर्वी विद्यार्थ्यांसाठी आकर्षित ऑफर आणली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रीमियम टियर मेंबरशिप घेणे अगदी सोपे होणार आहे. एवढेच नव्हेतर त्यांना फ्री ट्रायल देखील दिले जाईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकत्याकडे विद्यार्थी असल्याचा पुरावा असायला हवा.
यूट्यूबने म्हटले आहे की, कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थ्यांना यूट्यूब स्टुडंट मेंबरशिप उपलब्ध आहे. हे विद्यार्थी फुकटात ट्रायल घेऊ शकतात. युट्यूब ओळख पडताळणी प्लॅटफॉर्म SheerID सह विद्यार्थ्यांच्या आयडीची पडताळणी करेल आणि त्यानंतर वापरकर्त्यालवा मोफत मेंबरशिप मिळेल. या मेंबरशिपचा लाभ ४ वर्षांसाठी मिळू शकतो.
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांना YouTube Premium Student Plan जावे लागेल.
- जिथे 'Try it free' हा पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- पुढे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे नाव टाकायचे आहे.
- यानंतर SheerID त्याची पडताळणी करेल.
- पात्र उमेदवारांना नावनोंदणी क्रमांक आणि ईमेल आयडी विचारला जाईल.
- या डेटाची पडताळणी होताच तुम्हाला मेंबरशिप मिळणे सुरू होईल.
संबंधित बातम्या