how to trace stolen mobile: दूरसंचार विभागाच्या संचार साथी पोर्टलच्या मदतीने आतापर्यंत २.८५ लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल शोधण्यात आले आहेत. त्यापैकी २१ हजार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर ६.८ लाख फोन ब्लॉक करण्यात आले आहेत. सरकारी अंदाजानुसार, देशात दर महिन्याला ५० हजार मोबाइल चोरीला जातात.
साथी पोर्टल १६ मे पासून सुरू करण्यात आले. चोरीला गेलेले किंवा हरवलेले स्मार्टफोन ट्रॅक करण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी हे लॉन्च करण्यात आले आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरचा हा भाग आहे. लाँच झाल्यापासून दोन महिन्यांतच लोकांनी या पोर्टलवर फोन हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे पोर्टल अत्याधुनिक टेक्नोलॉजी प्रदान करते. जप्त करण्यात आलेल्या मोबाइलफोनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, लोकेशनवरून मोबाईलचे नेमके ठिकाण शोधले जाऊ शकते, यामुळे चोरींच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. पोलीसच चोरट्यांना शोधून काढू शकतात. राज्याच्या गृह विभागाकडे आम्ही याबाबत जोरदार पाठपुरावा करत आहोत. गुप्त माहितीची चोरी, चोरीच्या मोबाइलद्वारे बँक फ्रॉड अशा अनेक फसवणुकीपासून नागरिकांना वाचवणे, असा हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू आहे.
साथी पोर्टलच्या माध्यमातून मोबाइल वापरकर्त्याला आपल्या नावावर फसवणुकीने आणखी कनेक्शन घेण्यात आले आहे की नाही, याची माहिती मिळू शकते. हरवलेल्या मोबाइलचे लोकेशन शोधता येते. आपण आयएमईआय क्रमांक ब्लॉक करू शकता. ब्लॉक केल्यानंतर फोन वापरता येत नाही.
संबंधित बातम्या